नवीन वर्षांच्या पहिल्याच दिवशी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अॅबॉट यांची भेट दिली, या वेळी चहापानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय संघाबरोबरच ऑस्ट्रेलियाच्या संघानेही या वेळी एकत्रितपणे पंतप्रधानांबरोबर छायाचित्र काढले.
‘‘भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अॅबॉट यांची नूतन वर्षांच्या पहिल्या दिवशीच संध्याकाळी भेट घेतली. या वेळी पंतप्रधानांनी भारतीय संघासाठी चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता,’’ असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपल्या पत्रकात म्हटले आहे.
अॅबॉट यांनी भारताचा नवनिर्वाचित कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्हन स्मिथ यांच्यासह खास छायाचित्र काढले. या वेळी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करलेल्या महेंद्रसिंग धोनीच्या उपस्थितीतबाबत संभ्रम आहे. कारण कोणत्याही छायाचित्रांमध्ये धोनी नव्हता. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चौथा कसोटी सामना ६ जानेवारीपासून सुरू होणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा