रिओ डी जानिरो येथे २०१६ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धापूर्वी भारतात २०१५ ची जागतिक कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यासाठी भारत प्रयत्न करीत आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे सरचिटणीस राजसिंग यांनी ही माहिती दिली.वरिष्ठ पुरुषांच्या या स्पर्धेचे संयोजनपद भारतास मिळाले तर ही स्पर्धा येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये घेतली जाईल. अमेरिकेसह पाच-सहा देश ही स्पर्धा आयोजित करण्याबाबत उत्सुक आहेत, असे राजसिंग यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंघाचे (फिला) कार्यकारिणी सदस्य व १९७२ चे ऑलिम्पिक विजेते सॅबा हेजीदुस हे सध्या येथे जागतिक स्पर्धा आयोजित करणे शक्य आहे की नाही यासंबंधी प्राथमिक पाहणी करण्यासाठी आले आहेत. त्यांनी येथील सुविधांबाबत समाधान व्यक्त करीत सांगितले,‘‘जागतिक स्पर्धा आयोजित करण्याची क्षमता भारताकडे आहे व येथील सर्व सुविधा जागतिक स्पर्धेसाठी योग्य आहेत.   

Story img Loader