गेल्या काही वर्षात अनेक पाकिस्तानी खेळाडू मॅच फिक्सिंगमध्ये दोषी आढळले. अगदी काहीच दिवसांपूर्वी त्यात पाकिस्तानचा फलंदाज उमर अकमल याच्या नावाची भर पडली. यानंतर मॅच फिक्सिंगमुळे पाकिस्तान क्रिकेटचं नुकसान झालं असल्याची खंत अनेक पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी बोलून दाखवली. पण याच दरम्यान पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने मात्र मॅच फिक्सिंगचे सारं खापर भारतावर फोडलं. भारत हेच मॅच फिक्सिंग माफियांचं आश्रयस्थान आहे, असा खळबळजनक आरोप पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू अकीब जावेद याने केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

CSK ने शेअर केला १५ वर्ष जुना फोटो, पाहा तुम्हांला ओळखता येतात का खेळाडू?

१९९० च्या दशकात मॅच फिक्सिंगच्या भ्रष्टाचाराबद्दल अकीब जावेदने आवाज उठवला होता. वसीम अक्रम, वकार युनिस, सलीम मलिक या खेळाडूंचे मॅच फिक्सिंग संदर्भात नाव घेतल्यानंतर अकीब जावेदला जीवे मारण्याच्या धमक्याही मिळाल्या होत्या असं त्याने एका टीव्ही वाहिनीला मुलाखत देताना सांगितल्याचं वृत्त ‘एएफपी’ने दिलं आहे. IPL मध्ये मॅच फिक्सिंग झाल्याने अनेक वेळा प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. मला तर असं वाटतं की मॅच फिक्सिंग माफीयांचं आश्रयस्थान भारतच आहे. त्यांच्याविरोधात जे लोक आवाज उठवतात त्यांची कारकीर्द या ना त्या प्रकारे उद्ध्वस्त केली जाते. मला मॅच फिक्सिंगविरोधात बोलल्यानंतर फिक्सर्सकडून अनेकदा धमकीचे फोन आले होते. त्यांनी मला गंभीर इजा करण्याची धमकीदेखील दिली होती. मॅच फिक्सिंग करण्यासाठी केवळ चार-पाच खेळाडूंची गरज असते आणि १९९० च्या दशकात ते फार कठीण नव्हतं”, असं अकीब जावेद म्हणाला.

“कोणीही धोनीच्या रूममध्ये जावं, काहीही खायला मागवावं आणि…”; नेहराने सांगितला धमाल अनुभव

“पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ज्या प्रकारे मॅच फिक्सिंगचा आरोप असलेला मोहम्मद आमीर याला पुनरागमनाची संधी दिली, ते पाहून तर मॅच फिक्सिंग करणाऱ्यांना प्रोत्साहनच मिळेल. बऱ्याच वेळा संघाकडे दमदार कामगिरी करणारे खेळाडू होते, पण अनेक वेळा संघाने जाणूनबुजून वाईट खेळ केला”, असा आरोपही त्याने केला.