भारत ‘स्लिपिंग जायंट’ (निद्रावस्थेतील राक्षस) आहे, जागतिक फुटबॉल संघटनेचे अर्थात फिफाचे विपणन विभागाचे व्यवस्थापक थिएरी वेल यांनी मांडलेले हे मत. पुढील वर्षी भारतात होणाऱ्या १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पध्रेच्या निमित्ताने वेल यांचे हे वक्तव्य. पण, क्रिकेटवेडय़ा या भारतात फुटबॉलची आवड दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि या खेळातील गुंतवणुकीला येथे चांगला प्रतिसाद मिळेल, अशी प्रांजळ कबुलीही वेल यांनी दिली. गेल्या ३-४ वर्षांत भारतीय क्रीडा संस्कृतीचा विचार केल्यास क्रिकेटेतर खेळांनाही ‘अच्छे दिन’ आले आहेत. त्यात फुटबॉल हा नेहमी युवकांना आकर्षित करणारा आणि नेहमी चर्चेत असलेला खेळ. भारतातील युवा वर्गाची ही पसंत ओळखून अनेक उद्योजक, सिने अभिनेते, क्रिकेटमधील दिग्गजांनी फुटबॉलमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. रिलायन्सने त्यांना या गुंतवणुकीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आणि त्याला आपण इंडियन सुपर लीग अर्थात ‘आयएसएल’ म्हणून ओळखतो. विदेशी लीगला पर्याय म्हणून २०१४ मध्ये आलेल्या आयएसएलने दोन वर्षांत प्रेक्षकांमध्ये लक्षणीय वाढ केली. आय-लीगच्या सामन्याला तीन हजार प्रेक्षकांची जमवाजमव करताना स्थानिक संघटनांना घाम गाळावा लागत होता, परंतु आयएसएलच्या प्रत्येक सामन्याला १५ ते २५ हजार प्रेक्षक येऊ लागले. यातील प्रत्येक जण फुटबॉलप्रेमी आहेत असा दावा करणे जरा घाईचे होईल. मात्र या व्यावसायिक लीगने या खेळाला संजीवनी दिली. हा झाला खेळाचा भाग, परंतु आर्थिक गणितातही आयएसएल उंच भरारी घेण्यासाठी सज्ज झाला आहे. गेल्या दोन वर्षांतील नफ्या-तोटय़ाची आकडेवारी पाहिल्यास यंदा नफाच नफा असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
‘आयएसएल’ची आर्थिक गाडी रुळावर
भारत ‘स्लिपिंग जायंट’ (निद्रावस्थेतील राक्षस) आहे
Written by स्वदेश घाणेकर
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 02-10-2016 at 03:25 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India is the sleeping giant in football