Indian Cricket Team In ICC Test Rankings : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसाठी बुधवारचा (१५ फेब्रुवारी) दिवस मजेदार होता. कारण बुधवारी दुपारी आयसीसीने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधील संघाची आणि खेळाडूंची क्रमवारी अपडेट केली. आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत भारत पहिल्या क्रमांकावर होता. परंतु ४ तासांनी या यादीत भारत दुसऱ्या क्रमांकावर घसरल्याचं पाहायला मिळालं आणि ऑस्ट्रेलियाचा संघ पुन्हा पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बुधावारी दुपारी १.३० वाजता ऑस्ट्रेलियाचा संघ यादीत पहिल्या क्रमांकावर होता. तर दुपारी १.३२ वाजता भारत शीर्षस्थानी आणि ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या नंबरवर होता. परंतु क्रमवारीतला पहिल्या क्रमांकाचा मुकुट टीम इंडियाकडे फार वेळ राहिला नाही. संध्याकाळी ७.०८ वाजता यादी पुन्हा अपडेट करण्यात आली. या यादीत पुन्हा ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या तर भारत दुसऱ्या नंबरवर होता.

ICC चं नेमकं चाललंय काय?

काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, आयसीसीच्या वेबसाईटमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. परंतु असं होण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधीदेखील असं अनेकदा घडलं आहे. गेल्या महिन्यात देखील आयसीसीच्या क्रमवारीत चुका दिसल्या होत्या.

हे ही वाचा >> Women’s T20 WC मध्ये भारताच्या सामन्यापूर्वी भूकंप, स्पॉट फिक्सिंग प्रकरणाने जागतिक क्रिकेटला हादरा

टी-२० आणि वनडेमध्ये भारत नंबर वन

सध्या कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा संघ १२६ गुणांसह पहिल्या तर भारत ११५ गुणांसह दुसऱ्या नंबरवर आहे. भारतीय संघ गेल्या काही महिन्यांपासून टी-२० इंटरनॅशनलच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. तर आता एकदिवसीय क्रमवारीत देखील भारत पहिल्या नंबरवर आहे. अलिकडेच भारतात न्यूझीलंविरोधात खेळवण्यात आलेल्या एकदिवसीय मालिकेत भारताने न्यूझीलंडचा ३-० असा धुव्वा उडवला होता. त्याचा भारताला क्रमवारीत फायदा झाला.