पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात सलामीवीरांनी चांगली सुरुवात करून दिली. पण त्यानंतर भारताची मधली फळी कोसळली. त्यामुळेच भारताला पाच विकेट राखून पराभव पत्करावा लागला, असे मत भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने व्यक्त केले.
धोनी म्हणाला, ‘‘पहिल्या १० षटकांत बिनबाद ७५ अशी दमदार मजल मारल्यानंतर ठराविक अंतराने भारताचे फलंदाज बाद होत गेले. मोठे फटके खेळण्याच्या नादात आपले फलंदाज बाद झाले. जर आमच्या मधल्या फळीने दिमाखात फलंदाजी केली असती तर आम्हाला २०० धावांचे आव्हान आरामात राखता आले असते.’’
आर. अश्विनला विश्रांती दिल्याच्या धोरणाबाबत धोनी म्हणाला की, ‘‘या सामन्यात आम्ही तीन वेगवान गोलंदाजांना संधी दिल्यामुळे रवींद्र जडेजा या अष्टपैलू खेळाडूला खेळवणे पसंत केले.तथापि, पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद हाफीझ म्हणाला की, ‘‘आम्ही योजनापूर्वक खेळ केला. भारताचे कामचलाऊ फिरकी गोलंदाज युवराज सिंग आणि जडेजा यांच्याकडून अपेक्षित मारा झाला नाही.’’

Story img Loader