India Kho-Kho Men’s Team win World Cup: पहिलाच खो-खो विश्वचषक भारतात खेळवला गेला आणि महिला-पुरूष दोन्ही संघांमध्ये भारताच्या संघाने इतिहास घडवला आहे. महिला खो खो संघानंतर पुरूष खो-खो संघानेही नेपाळला नमवत विश्वचषक जिंकला. भारतीय पुरुष संघाची संपूर्ण स्पर्धेत अपराजित होता आणि भारताच्या पुरूष संघाने अंतिम फेरीतही विजय मिळवला. टीम इंडियाने नेपाळविरुद्धचा सामना ५४-३६ अशा फरकाने जिंकला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भारतीय संघ अशारितीने खो खो वर्ल्ड चॅम्पियन ठरला आहे. महिला खो खो संघाने नेपाळचा ७८-४० च्या फरकाने पराभव केला. तर पुरूष संघाने नेपाळचा ५४-३६ च्या फरकाने सामना जिंकला. नेपाळच्या पुरूष संघाने भारताला चांगलीच टक्कर दिली पण अखेरीस भारताने बाजी मारली.

हेही वाचा – भारत खो-खो वर्ल्ड चॅम्पियन, महिला संघासह पुरूष संघाची सुवर्णपदकाला गवसणी

खो-खो विश्वचषक २०२५ पुरुषांच्या अंतिम सामन्यात, भारतीय संघाची नेपाळविरुद्ध चांगली सुरुवात झाली, ज्यामध्ये त्यांनी पहिल्या टर्नमध्येच २६ गुण मिळवले आणि नेपाळ संघाला खाते उघडण्याची संधीही दिली नाही. दुसऱ्या टर्नमध्ये नेपाळ संघाने पुनरागमन करण्याच प्रयत्न केला. ज्यात त्यांनी एकूण १८ गुण मिळवले परंतु टीम इंडियाने ८ गुणांची आघाडी कायम राखली.

हेही वाचा – INDW vs WIW: भारताच्या लेकींची टी-२० वर्ल्डकपमध्ये दणक्यात सुरूवात, २६ चेंडूतच जिंकला पहिला सामना; वेस्ट इंडिजचा उडवला धुव्वा

तिसऱ्या टर्नमध्ये भारतीय पुरुष खो-खो संघाने शानदार पुनरागमन केले, ज्यामध्ये त्यांनी नेपाळला विजेतेपदाच्या सामन्यातून पूर्णपणे बाहेर केले आणि त्यांचे गुण ५०च्या पुढे नेले. भारतीय पुरुष खो-खो संघाने नेपाळविरुद्धच्या अंतिम सामन्यात पहिल्या तीन टर्नमध्ये आपली आघाडी कायम ठेवली होती, तर चौथ्या टर्नमध्येही चांगली कामगिरी करत५४-३६ अशा फरकाने सामना जिंकला.

हेही वाचा – Manu Bhaker: मनू भाकेरच्या कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर, आजी आणि मामाचा रस्ते अपघातात मृत्यू

भारतीय पुरुष खो-खो संघाने या विश्वचषकात दुसऱ्यांदा नेपाळ संघाचा पराभव केला आहे, याआधी गट सामन्यात दोन्ही संघ आमने-सामने आले होते आणि त्यातही टीम इंडिया विजय मिळवण्यात यशस्वी ठरली होती. पुरुषांच्या खो-खो विश्वचषकाच्या पहिल्याच सीझनमध्ये एकूण २० संघांनी भाग घेतला होता. यातून भारताच्या संघाने बाजी मारत वर्ल्डकप ट्रॉफी जिंकली आहे.