लखनौ येथे डिसेंबरमध्ये होणारी भारतीय खुली बॅडमिंटन स्पर्धा जानेवारीत आयोजित केली जाणार आहे. परदेशी खेळाडूंना या स्पर्धेत भाग घेता यावा यासाठी हा बदल करण्यात आला आहे.
भारतीय बॅडमिंटन महासंघाचे सरचिटणीस विजय सिन्हा यांनी ही माहिती दिली. २००९ पासून दरवर्षी ही स्पर्धा आयोजित केली जाते. १९८२ चा राष्ट्रकुल विजेता सईद मोदी याच्या स्मरणार्थ ही स्पर्धा घेण्यात येते. परदेशातील अनेक खेळाडू नाताळचे सुट्टीवर असतात तसेच काही परदेशी खेळाडूंना अन्य स्पर्धेत भाग घ्यावयाचा असतो. त्यामुळेच ही स्पर्धा जानेवारीत आयोजित करण्याबाबत आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघाकडे परवानगी मागितली होती. ही परवानगी मिळाली असून आता ही स्पर्धा २१ ते २६ जानेवारी या कालावधीत होईल.
ही स्पर्धा मूळ कार्यक्रमपत्रिकेनुसार १७ ते २२ डिसेंबर दरम्यान आयोजित केली जाणार होती. गतवर्षी भारताच्या पारुपल्ली कश्यपने ही स्पर्धा जिंकली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा