यजमान बांगलादेश महिला आशिया चषक २०२२ च्या आवृत्तीची सुरुवात एक ऑक्टोबर रोजी थायलंडविरुद्ध करेल. त्याच दिवशी भारताची श्रीलंकेशीही लढत होईल, तर ७ ऑक्टोबरला त्यांचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी सामना होईल. महिला चषक आशियातील ही आठवी आवृत्ती आहे. पहिला आशिया चषक २००४ मध्ये कोलंबो आणि कॅंडी, श्रीलंका येथे आयोजित करण्यात आला होता. २०१८ पर्यंत ही स्पर्धा नियमितपणे खेळली गेली, परंतु कोविड-१९ महामारीमुळे ती २०२० आणि २०२१ पर्यंत पुढे ढकलण्यात आली. आता या स्पर्धेची पुढील आवृत्ती २०२२ मध्ये खेळवली जाईल.

राउंड रॉबिन पद्धतीने या स्पर्धेत सात संघ आहेत. सर्व संघ ६-६ सामने खेळतील. यानंतर अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. चार संघांमध्ये दोन उपांत्य फेरी खेळल्या जातील आणि त्यानंतर १५ ऑक्टोबरला अंतिम सामना खेळवला जाईल. महिला आशिया चषक २०१२ पासून टी२० प्रकारामध्ये खेळला जात आहे. यापूर्वी तो एकदिवसीय स्वरूपात खेळला जात होता. २०१२ च्या आवृत्तीत आठ संघ दोन गट आणि उपांत्य फेरीत विभागले गेले, परंतु शेवटच्या दोन आवृत्त्यांमध्ये (२०१६ आणि २०१८) कमी संघ होते. अशा स्थितीत दोन अव्वल संघांमध्ये फायनलची लढत होती.

हेही वाचा : फिफा अंडर-१७ महिला फुटबॉल विश्वचषक इंडिया २०२२ स्पर्धेला ११ ऑक्टोबरपासून सुरुवात  

सहा वेळा विजेते भारत, यजमान बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, थायलंड, मलेशिया आणि यूएई हे सात संघ आहेत. मलेशिया आणि युएई ने एसीसी महिला टी२० चॅम्पियनशिप पात्रता स्पर्धेद्वारे स्पर्धेत प्रवेश केला आहे. २०१८ नंतर बांगलादेश प्रथमच महिलांच्या सामन्यांचे आयोजन करणार आहे. सिल्हेटमध्ये खेळले जाणारे सर्व सामने सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आणि सिल्हेट आऊटर क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत. यजमान बांगलादेश देखील गतविजेते आहेत, कारण त्यांनी २०१८ मध्ये एका रोमांचक फायनलमध्ये सहा वेळा विजयी भारताचा पराभव केला होता. त्यानंतरची २०२० आवृत्ती साथीच्या आजारामुळे आयोजित करता आली नाही.

हेही वाचा :  Jasprit Bumrah: ब्रेकिंग! आगामी टी२० विश्वचषकातून जसप्रीत बुमराह बाहेर, रोहित सेनेला मोठा धक्का 

१५ ऑक्टोबरला अंतिम सामना होणार आहे

२०२२ महिला आशिया चषकाचा पहिला उपांत्य सामना १३ ऑक्टोबर रोजी सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सकाळी ९.०० वाजता खेळवला जाईल. याच मैदानावर १३ ऑक्टोबर रोजी दुसरा उपांत्य फेरीचा सामनाही होणार आहे, परंतु वेळ दुपारी १.०० वाजता असेल. स्पर्धेचा अंतिम सामना १५ ऑक्टोबर रोजी सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दुपारी १.०० वाजता खेळवला जाईल.

महिला आशिया चषक २०२२ चे सर्व सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केले जातील. स्पर्धेच्या सामन्यांचे थेट स्टार स्पोर्ट्स, प्रवाह डिज्नी हॉटस्टार ऍपवर आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.

Story img Loader