इन्चेनॉन, दक्षिण कोरिया येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत, भारत आणि पाकिस्तान हॉकी संघ एकमेकांसमोर प्राथमिक गटातच उभे ठाकणार आहेत.
पाकिस्तानने तब्बल आठवेळा जेतेपद या स्पर्धेत जेतेपद पटकावले आहे. ब गटात गतविजेत्या पाकिस्तानसह भारत, चीन, ओमान आणि श्रीलंका हे संघ असणार आहेत. मलेशिया, दक्षिण कोरिया, जपान, बांगलादेश आणि सिंगापूर ब गटात असणार आहेत.
महिलांमध्ये अ गटात भारताबरोबर मलेशिया, चीन, थायलंड यांचे आव्हान असणार आहे. ब गटात दक्षिण कोरिया, जपान, कझाकिस्तान आणि हाँगकाँग हे संघ आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेत जेतेपद पटकावणाऱ्या संघाला २०१६ रिओ ऑलिम्पिकसाठी थेट पात्र होण्याची संधी मिळणार असल्याने या स्पर्धेला अनोखे महत्त्व प्राप्त झाले आहे.

Story img Loader