भारतीय फुटबॉल संघ ६ फेब्रुवारीला गुवाहाटी येथे पॅलेस्टाइनविरुद्ध आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण फुटबॉल सामना खेळणार आहे, असे अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने कळवले आहे. भारताचा अखेरचा मैत्रीपूर्ण सामना येमेनविरुद्ध नोव्हेंबर महिन्यात होणार होता. पण येमेनच्या खेळाडूंना व्हिसा मिळवण्यात अडचणी आल्याने हा सामना रद्द करण्यात आला. पॅलेस्टाइन संघ फिफा क्रमवारीत १५२व्या तर भारत १६६व्या क्रमांकावर आहे.
भारताचा पॅलेस्टाइनविरुद्ध मैत्रीपूर्ण फुटबॉल सामना
भारतीय फुटबॉल संघ ६ फेब्रुवारीला गुवाहाटी येथे पॅलेस्टाइनविरुद्ध आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण फुटबॉल सामना खेळणार आहे, असे अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने कळवले आहे. भारताचा अखेरचा मैत्रीपूर्ण सामना येमेनविरुद्ध नोव्हेंबर महिन्यात होणार होता.
First published on: 29-12-2012 at 05:20 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India palestine friendly play football match