India Probable Playing XI for IND vs BAN 2nd Test: भारतीय संघाने रविवारी (२२ सप्टेंबर) चौथ्या दिवशीच २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशचा पराभव केला. यानंतर लगेचच बीसीसीआयने दुसऱ्या कसोटी संघाची घोषणा केली. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पहिल्या कसोटीचाच संघ दुसऱ्या कसोटीसाठी कायम ठेवण्यात आला आहे. आता दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी प्लेईंग इलेव्हनमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय संघ चेन्नईच्या लाल मातीच्या खेळपट्टीवर ३ वेगवान गोलंदाज आणि २ फिरकीपटूंसह मैदानात उतरला होता. आता संघ कानपूरच्या काळ्या मातीच्या खेळपट्टीवर ३ फिरकी गोलंदाज आणि २ वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरू शकतो. यामुळे टीम इंडियामध्ये कानपूरचा खेळाडू कुलदीप यादवला त्याच्या घरच्या मैदानावर खेळण्याची संधी मिळू शकते.

हेही वाचा – VIDEO: अफगाणिस्तानच्या फलंदाजाने स्वत:लाच केलं बाद; क्रिकेट इतिहासातला आश्चर्यकारक रनआऊट

बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रोहित शर्मा २ बदल करण्याची शक्यता आहे. दोन्ही बदल गोलंदाजी युनिटमध्ये होऊ शकतात. भारताला अनेक कसोटी सामने खेळायचे असल्याने, जसप्रीत बुमराह किंवा मोहम्मद सिराज यापैकी एक गोलंदाजाला विश्रांती मिळू शकते. सिराज-बुमराहपैकी एका गोलंदाजाला विश्रांती दिल्यास उत्तर प्रदेशचा युवा खेळाडू यश दयाललाही पदार्पणाची संधी मिळू शकते किंवा आकाशदीपच्या जागी खेळू शकतो.

हेही वाचा – IND vs BAN: “…म्हणून मी बांगलादेशची फिल्डिंग सेट केली”, ऋषभ पंतने अजय जडेजाचा उल्लेख करत दिलं मनं जिंकणारं उत्तर

आकाशदीपने आतापर्यंत मिळालेल्या संधींमध्ये आपल्या कामगिरीची छाप पाडली आहे. दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी यश दयालला आजमावण्याचा संघ प्रयत्न करेल. मोहम्मद शमीचेही न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत पुनरागमन होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत यश दयाल कानपूर कसोटीत खेळण्याची शक्यता आहे. काळ्या मातीची खेळपट्टी फिरकीपटूंना मदत करणारी असेल. त्यामुळे रोहित शर्माला अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांच्यापैकी एकाची निवड करावी लागेल.

IND vs BAN: ३ फिरकीपटू आणि दोन वेगवान गोलंदाज खेळवण्याची शक्यता

रविचंद्रन अश्विन ८व्या क्रमांकावर फलंदाजीला उतरतो, त्यामुळे भारतीय संघाला आणखी एका फलंदाजाची गरज भासणार नाही. तर ९व्या क्रमांकावर कुलदीप चांगली फलंदाजी करू शकतो. रवींद्र जडेजा उपलब्ध नसेल किंवा अतिरिक्त फलंदाजाची गरज असेल तेव्हाच अक्षरला संधी मिळू शकते. भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध कानपूरमध्ये ३ फिरकीपटू आणि ३ वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरू शकतो.

हेही वाचा – IND vs BAN: पहिल्या कसोटीनंतर WTC Final मध्ये जाण्यासाठी भारताला किती सामने जिंकावे लागतील? जाणून घ्या समीकरण

बांगलादेशविरूद्ध दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघाची संभाव्य प्लेईंग इलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India playing 11 might change for india vs bangladesh kanpur test kuldeep yadav yash dayal to get chances ind vs ban 2nd test bdg