India Playing XI For IND vs AUS 2nd Test: भारत वि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना आज गाबा येथे खेळवला जात आहे. या सामन्याची नाणेफेक भारतीय संघाने जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासह भारताने तिसऱ्या कसोटीसाठी महत्त्वपूर्ण नाणेफेक जिंकली आहे. रोहित शर्माने नाणेफेक जिंकल्यानंतर प्लेईंग इलेव्हन जाहीर करत संघात दोन मोठे बदल केले आहेत.

ॲडलेड कसोटीत खेळलेला अनुभवी फिरकीपटू आर अश्विन आणि हर्षित राणा यांना संघातून वगळण्यात आले आहे. रवींद्र जडेजाचे संघात पुनरागमन झाले आहे, तर आकाश दीपला प्रथमच ऑस्ट्रेलियात खेळण्याची संधी मिळाली आहे. यजमान ऑस्ट्रेलियानेही आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला असून, स्कॉट बोलँडच्या जागी जोश हेझलवूडचा समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचा – VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम

रविचंद्रन अश्विनच्या जागी जडेजाला का संधी?

ॲडलेड कसोटीत आर अश्विनकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती पण तो काही विशेष करू शकला नाही. त्याने पहिल्या डावात १८ षटकं टाकली आणि ५३ धावा देत १ विकेट घेतली. दुसऱ्या डावात त्याला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. त्याने पहिल्या डावात २२ आणि दुसऱ्या डावात ७ धावांचे योगदान दिले. यानंतर फिरकीपटू म्हणून आता रवींद्र जडेजाला संधी देण्यात आली आहे.

भारतीय कर्णधाराने अश्विनला वगळल्यानंतर अनुभवी फिरकीपटूला संघात सामील करण्याचा निर्णय घेतला आहे. जडेजाने अखेरचा कसोटी सामना न्यूझीलंडविरूद्ध घरच्या मैदानावर खेळला होता. न्यूझीलंडविरुद्धच्या ३ सामन्यात त्याने एकूण १६ विकेट घेतल्या. ब्रिस्बेनच्या खेळपट्टीवर चौथ्या आणि पाचव्या दिवशी फिरकी गोलंदाज महत्त्वाची भूमिका बजावेल.

हेही वाचा – IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?

आकाशदीप पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात खेळणार

दुसरीकडे, पर्थमध्ये आपल्या गोलंदाजीची छाप पाडणाऱ्या हर्षित राणाला ॲडलेडमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. आता त्याची जागा आकाश दीपने घेतली आहे, ज्याने अलीकडच्या काळात कसोटीत चमकदार गोलंदाजी केली आहे. त्याच्या गोलंदाजी कौशल्याची तुलना मोहम्मद शमीशी केली जाते. गाबाची विकेट वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल असणार आहे. अचूक लाइन-लेंथ असलेल्या गोलंदाजांना या विकेटवर यश मिळण्याची अपेक्षा आहे. आकाशदीप याच गोष्टीसाठी ओळखला जातो. याशिवाय, तो सीम हालचालीच्या मदतीने चेंडू आत आणण्यातही माहीर आहे. त्यामुळे त्याला या खेळपट्टीवर संधी देण्यात आली आहे.

हेही वाचा – Who is D Gukesh: कोण आहे डी गुकेश? वडिलांनी करिअर लावलं पणाला अन् लेक १८व्या वर्षी ठरला विश्वविजेता; वाचा त्याची कहाणी

तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन:

यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, रोहित शर्मा (कर्णधार), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन:

उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी, जोश हेझलवूड, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन

Story img Loader