IND vs SL 1st T20I Probable Playing XI: टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आता भारतीय संघ आपला नवीन कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहे. कर्णधार रोहित शर्माने टी-२० मधून निवृत्ती घेतल्यानंतर सूर्यकुमारला कर्णधारपद देण्यात आले आहे. सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध (IND vs SL) तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे, जी शनिवार २७ जुलैपासून सुरू होणार आहे. सूर्यकुमार यादव त्याच्या नेतृत्वाखाली यजमान श्रीलंकेला पराभूत करून कर्णधार म्हणून चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न करेल. तर नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर यांचाही हा पहिलाच दौरा आहे.

हेही वाचा – India in Asia Cup Final: भारताची आशिया चषकाच्या अंतिम फेरीत धडक, स्मृती मानधनाचे शानदार अर्धशतक

Shubman Gill ruled out of first Test match in Perth because of fractured thumb IND vs AUS Border Gavaskar Trophy
IND vs AUS: शुबमन गिल ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिल्या कसोटीतून बाहेर, टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या, ‘हा’ खेळाडू करणार पदार्पण?
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
India Scored 2nd Highest T20 Total of 283 Runs Tilak Varma and Sanju Samson Scored Individual Centuries with Record Breaking Partnership IND vs SA
IND vs SA: टीम इंडियाचा धावांचा पर्वत, संजू-तिलकची शतकं आणि विक्रमी भागीदारी
India vs South Africa 4th T20 Live Updates in Marathi
IND vs SA: भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विक्रमी १३५ धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली
IND vs SA 3rd T20I Match Stopped Due to Flying Ants engulfed the Centurion Stadium
IND vs SA: ना पाऊस, ना खराब हवामान… चक्क कीटकांनी रोखला भारत-आफ्रिका सामना, मैदानात नेमकं काय घडलं?
India vs South Africa 3rd T20 Highlights in Marathi
IND vs SA 3rd T20 Highlights : रोमहर्षक सामन्यात भारताने मारली बाजी! तिलक वर्माचा शतकी तडाखा, मालिकेत २-१ घेतली आघाडी
IND vs SA 3rd T20 Match Timing Changes India vs South Africa centurion
IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका तिसरा टी-२० सामना दुसऱ्या सामन्यापेक्षा उशिराने सुरू होणार, जाणून घ्या काय आहे नेमकी वेळ?
Sanju Samson broke Yusuf Pathan's 15-year-old record
IND vs SA : संजू सॅमसनने सलग दोन शतकांनंतर केला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत युसूफ-रोहितला टाकले मागे

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी-२० मधून निवृत्ती घेतली आहे, तर संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. साहजिकच संघात या तीन उत्कृष्ट खेळाडूंच्या अनुपस्थितीचा फायदा प्रतिस्पर्धी संघाला नक्कीच घ्यायचा असेल. सध्या भारतीय संघही बदलाच्या टप्प्यातून जात आहे आणि आता पुढील टी-२० विश्वचषकासाठी संघ तयारी करत आहे.

हेही वाचा – Rohit Sharma: “रोहित चक्कर येऊन पडेल…”, हिटमॅन- विराट २०२७ चा वर्ल्डकप खेळण्यावर भारताच्या माजी क्रिकेटरचे मोठे वक्तव्य

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात ऋषभ पंतच्या उपस्थितीमुळे, संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये वगळले जाऊ शकते, तर हार्दिक पंड्याच्या उपस्थितीमुळे शिवम दुबेला वगळले जाऊ शकते. श्रीलंकेत फिरकीपटूंना मदत मिळते, त्यामुळे शिवम दुबेच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला संघात संधी दिली जाऊ शकते, जो झिम्बाब्वे दौऱ्यावर मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू होता. रिंकू सिंगही संघात असेल, त्यामुळे दुबेला जागा प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळणं अवघड असेल. या सामन्यात भारत हार्दिक पंड्या, अक्षर पटेल आणि सुंदर यांना अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळवू शकतो.

हेही वाचा – Jasprit Bumrah: “सर्वजण एकत्र होतो अन् त्याला…” हार्दिकची हुर्याे उडवली जात असताना MI संघात कसं वातावरण होतं? बुमराहचं मोठं वक्तव्य

भारतासाठी सलामी देण्याची जबाबदारी शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांच्यावर असेल, तर तिसऱ्या क्रमांकावर चांगली कामगिरी करणारा ऋषभ पंत असेल. कर्णधार सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येईल तर रिंकू सिंग आणि त्यानंतर हार्दिक पंड्या पाचव्या क्रमांकावर उतरेल. यानंतर अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर फलंदाजीला उतरतील. संघात वेगवान गोलंदाज म्हणून अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज यांना संधी दिली जाऊ शकते. मात्र, सरावादरम्यान सिराजला दुखापत झाली आहे, या स्थितीत तो उपलब्ध नसल्यास खलील अहमदला संधी दिली जाऊ शकते, तर रवी बिश्नोईलासुध्दा फिरकी गोलंदाज म्हणून संघात संधी दिली जाऊ शकते.

IND vs SL: पहिल्या टी-२० साठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, मोहम्मद. सिराज.