India Playing XI and Toss Update of IND vs ENG 1st ODI: चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारत वि इंग्लंड वनडे मालिका भारतात खेळवली जात आहे. या वनडे मालिकेतील पहिला सामना नागपूरात खेळवला जात आहे. भारत वि इंग्लंड पहिल्या वनडे सामन्याची नाणेफेक इंग्लंड संघाने जिंकली असून त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दोन्ही संघांसाठी हे सराव सामने असणार आहेत. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत भारताकडून नव्या वेगवान गोलंदाजाने पदार्पण केले आहे. तर अजून एका फलंदाजाही पदार्पणाची संधी मिळाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताकडून यशस्वी जैस्वाल आणि हर्षित राणा या दोघांनी भारताकडून वनडेमध्ये पदार्पण केलं आहे. पहिल्या वनडे सामन्यापूर्वी यशस्वी जैस्वाल आणि हर्षित राणा यांना एकदिवसीय पदार्पणाची कॅप्स देण्यात आली. तर मोहम्मद शमी, कुलदीप यादव भारतीय संघात परत आले आहेत. पण सर्वात मोठा धक्का म्हणजे दुखापतीमुळे विराट कोहली पहिल्या वनडेमध्ये खेळताना दिसणार नाही. पण अखेरच्या क्षणी बीसीसीआयने वनडे संघात संधी दिलेल्या वरूण चक्रवर्तीला मात्र वनडे पदार्पणासाठी वाट पाहावी लागणार आहे.

जोस बटलरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर रोहित शर्माने नाणेफेकीनंतर संघ प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेणार होता हे सांगितले. इंग्लंडने एक दिवस आधीच प्लेईंग इलेव्हन जाहीर केली होती. ज्यामध्ये इंग्लिश संघाचा विस्फोटक फलंदाज जो रूट २०२३ च्या विश्वचषकानंतर वनडे संघामध्ये पुनरागमन करत आहे. यासह इंग्लंडचा संघ ४ वेगवान गोलंदाजांसह खेळत आहे. तर भारताच्या ताफ्यात ३ वेगवान गोलंदाज आहेत.

पहिल्या वनडेसाठी भारताची प्लेइंग इलेव्हन:

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, शुभमन गिल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी.

पहिल्या वनडेसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन:

बेन डकेट, फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, साकिब महमूद.