PM Modi calls Indian men’s hockey Team: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या हॉकी संघाने कांस्यपदकासाठीच्या सामन्यात स्पेनवर विजय मिळवला. अशारितीने भारतीय हॉकी संघाने भारताला पॅरिस ऑलिम्पिकमधील चौथे पदक मिळवून दिले. कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवर संवाद साधला. कांस्यपदकाच्या लढतीत भारताने स्पेनचा २-१ असा पराभव करून कांस्यपदक जिंकले. हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील संघ उपांत्य फेरीत जर्मनीकडून २-३ असा पराभूत झाला आणि अंतिम फेरी गाठू शकला नाही. पण कांस्यपदकाला संघाने गवसणी घालत भारतीयांना आनंदाचे काही क्षण दिले आहेत. यानंतर पंतप्रधान मोदींनी खेळाडूंना कॉल करत त्यांच्याशी संवाद साधला याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

हेही वाचा – Neeraj Chopra Javelin Throw Final Live : नीरज चोप्रा ऐतिहासिक कामगिरी करण्यासाठी सज्ज, भारताला पाचव्या पदकाची आशा

Sanju Samson meets Female Fan After Match Who Injured by His Massive Six Watch Video IND vs SA
संजू सॅमसनच्या ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मनं, षटकारामुळे घायाळ झालेल्या चाहतीची घेतली भेट अन्…, पाहा VIDEO
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Suryakumar Yadav Speech in dressing room video
Suryakumar Yadav : ‘आता सगळ्यांनी मायदेशात जाऊन…’, दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका जिंकल्यानंतर सूर्याने संघाला दिला महत्त्वाचा सल्ला
Suryakumar Yadav won the hearts of fans video viral
Suryakumar Yadav : याला म्हणतात देशभक्ती… देशाचा अपमान होताना पाहून सूर्यकुमार यादवने केलं असं काही की, तुम्हीही कराल सलाम, पाहा VIDEO
nitish kumar bows down to touch feet of pm modi
VIDEO: भरसभेत नितीश कुमार पाया पडायला गेले अन् नरेंद्र मोदींनी…; नेमकं काय घडलं?
Raosaheb Danave Beating Karyakarta
Raosaheb Danave Viral Video : फोटो फ्रेममध्ये येणाऱ्या कार्यकर्त्याला रावसाहेब दानवेंनी लाथाडलं; VIDEO व्हायरल!
Suryakumar Yadav video with Pakistani fan goes viral :
Suryakumar Yadav : तुम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात का येत नाही? चाहत्याच्या प्रश्नावर सूर्या म्हणाला, ‘हे आमच्या…’

भारतीय हॉकी संघाशी फोनवर संवाद साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘तुम्ही भारताचा गौरव केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन. तुम्ही ऑलिम्पिकमधील पराभवाची मालिका मोडली आहे. मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही भारतात हॉकीचा सुवर्णकाळ परत आणाल.

Paris Olympics 2024: नरेंद्र मोदी भारताच्या हॉकी संघाशी कॉलवर काय काय बोलले?

पीएम मोदी पुढे म्हणाले, ‘ही एक अशी कामगिरी आहे जी येणाऱ्या पिढ्यांसाठी अमूल्य असेल! भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये आपली चमकदार कामगिरी केली आणि कांस्यपदक पटकावून परत येणार आहे. हे आणखी विशेष आहे कारण ऑलिम्पिकमधले हे त्याचे सलग दुसरे पदक आहे. त्यांचे यश कौशल्य, संयम आणि सांघिक भावनेचा विजय आहे. तुम्ही मोठे धाडस आणि जिद्द दाखवली. खेळाडूंचे अभिनंदन. प्रत्येक भारतीयाचं हॉकीशी भावनिक नातं आहे आणि या कामगिरीमुळे हा खेळ आपल्या देशातील तरुणांमध्ये अधिक लोकप्रिय होईल.”

हेही वाचा – India vs Spain: ग्लोव्हज, हेल्मेटसमोर नतमस्तक अन् मग थेट चढून गोलपोस्टवर बसून श्रीजेशने साजरा केला अखेरच्या सामन्याचा विजय, पाहा VIDEO

हेही वाचा – Neeraj Chopra Final: नीरज चोप्राला तगडी टक्कर देणारा जॅकब वडेलज नेमका आहे तरी कोण? भालाफेक रॅकिंगमध्ये आहे जगातील नंबर वन खेळाडू

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचा गोलरक्षक पीआर श्रीजेश यांच्याशीही खास चर्चा केली. श्रीजेशने जरी निवृत्ती घेतली असली तरी त्याला भविष्यासाठी नवी टीम इंडिया तयार करावी लागेल, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. पंतप्रधान मोदींनी श्रीजेशला आवाहन करत त्याच्यावर ही मोठी जबाबदारी दिली आहे. १० खेळाडूंसह ग्रेट ब्रिटनविरुद्ध विजयाची नोंद करण्यात हा संघ कसा यशस्वी ठरला याबद्दल त्यांनी टीम इंडियाचे अभिनंदनही केले. भारतातील प्रत्येक मुलाला हा ऐतिहासिक विजय स्मरणात राहील, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.