IND vs NZ 2nd Test Predicted Playing XI: न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात काही खेळाडूंनी चांगली कामगिरी करूनही टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया पुणे कसोटी जिंकून कसोटी मालिकेत पुनरागमन करण्यासाठी उत्सुक आहे. पहिल्या कसोटीतील विजयानंतर किवी संघही उत्साहात असून मालिका विजयावर त्यांच्या नजरा असतील, अशा स्थितीत टीम इंडियाला आपली प्लेइंग इलेव्हन अत्यंत काळजीपूर्वक निवडावे लागणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सर्फराझ खान की केएल राहुल? कोणाला मिळणार संधी

शुबमन गिल दुखापतीतून सावरला असून दुसऱ्या कसोटी सामन्यात तो तिसऱ्या क्रमांकावर खेळताना दिसण्याची शक्यता आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी केएल राहुल दुसऱ्या कसोटीत खेळणार असल्याचे संकेत दिले आहेत, या स्थितीत सर्फराझ खानला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणार का हा मोठा प्रश्न आहे. सर्फराझने पहिल्या कसोटीत १५० धावांची शानदार खेळी केली आणि तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघ कोणाला संधी देणार यावर सर्वांच्या नजरा आहेत.

हेही वाचा – VIDEO: नवा विश्वविक्रम! न्यूझीलंडच्या खेळाडूने फक्त इतक्या चेंडूत झळकावले सर्वात जलद द्विशतक

अश्विनच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळणार?

फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरचा दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघात समावेश करण्यात आला. त्यामुळे त्याला दुसऱ्या कसोटी सामन्याच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं तर त्याच्या जागी कोणाला वगळले जाऊ शकते हा मोठा प्रश्न आहे. आर अश्विन सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि तोही चमकदार फलंदाजी करतो, पण तरीही वॉशिंग्टन सुंदरचा फॉर्म पाहता त्याला पुन्हा संघात संधी देतील अशी चिन्हे आहेत. न्यूझीलंडची फलंदाजी पाहून सुंदरला संघात संधी देण्यात आली आहे, त्यामुळे आता जडेजा किंवा अश्विनच्या जागी सुंदरला संधी मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – ICC Test Rankings: ऋषभ पंतने ताज्या ICC क्रमवारीत विराट कोहलीला टाकलं मागे, सर्फराझ खान केएल राहुलच्या पुढे; टॉप १० खेळाडू कोण?

दुसऱ्या कसोटीसाठी भारताची संभाव्य प्लेईंग इलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल/सर्फराझ खान, आर अश्विन/वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव</p>

दुसऱ्या कसोटीसाठी न्यूझीलंड संघाची प्लेईंग इलेव्हन

टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉन्वे, विल यंग, ​​रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मॅट हेन्री, टिम साऊदी, एजाज पटेल, विल्यम ओरुक.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India predicted playing xi for ind vs nz 2nd pune test washington sundar might replace ravichandran ashwin bdg