IND vs ENG 1st T20I India Probable Playing XI: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची टी-२० मालिका २२ जानेवारीपासून सुरू होत आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवला जाणार आहे. या मालिकेसाठी शुबमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांना विश्रांती देण्यात आली आहे. जसप्रीत बुमराह देखील पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे या मालिकेत खेळताना दिसणार नाही. या मालिकेतून भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी १४ महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. यासह सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखाली भारताची प्लेईंग इलेव्हन कशी असू शकते, जाणून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंग्लंड संघाने आपली प्लेइंग इलेव्हन एक दिवस आधीच जाहीर केली आहे. बेन डकेटसह फिल सॉल्ट सलामीला उतरणार आहे. तर कर्णधार जोस बटलर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. हॅरी ब्रुकला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि मार्क वुडला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले आहे.

भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा सलामीला उतरताना दिसणार आहेत. अष्टपैलू नितीशकुमार रेड्डीला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. मोहम्मद शमीसह अर्शदीप सिंग वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करेल. फिरकी विभागाची जबाबदारी वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांच्याकडे असेल. तर अक्षर पटेल संघाचा उपकर्णधार असणार आहे. तर भारताचा सर्वात महत्त्वाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी संघात पुनरागमन करणार आहे, त्याच्यावर सर्वांच्या नजरा असणार आहेत. तर भारतीय संघ या सामन्यात २ फिरकीपटूंसह मैदानात उतरू शकतो.

ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीचा अहवाल आणि हवामान

इंडियन प्रीमियर लीग २०२४ सीझनमध्ये ईडनची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल आहे. गेल्या मोसमात पंजाब किंग्जने केकेआरविरुद्ध ८ चेंडू बाकी असताना २६२ धावांचा पाठलाग करून इतिहास रचला होता. खरंतर, राजस्थान रॉयल्सने २०२४ मध्ये केकेआरविरूद्ध २२४ धावांचा पाठलाग करताना विजय मिळवला.

त्यामुळे खेळपट्टी ही सारखीच खेळण्याची अपेक्षा आहे आणि संध्याकाळी दव पडल्यामुळे गोष्टी बदलू शकतात. संपूर्ण भारतात हिवाळा आहे आणि दवामुळे सामन्याच्या दुसऱ्या डावात गोलंदाजांसाठी गोलंदाजी करणं कठीण होईल अशी अपेक्षा आहे.

भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:

संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती.

इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन:

बेन डकेट, फिल सॉल्ट, जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, जेमी ओव्हरटन, गस ऍटकिन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India probable playing xi for ind vs eng 1st t20i kolkata pitch report and weather bdg