India Probable Playing XI For IND vs NZ 1st Test: भारतीय क्रिकेट संघाला न्यूझीलंडविरूद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेतील पहिला सामना १६ ऑक्टोबरपासून खेळवला जाणार आहे. पण या पहिल्या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. प्लेईंग इलेव्हनमधील महत्त्वाचा फलंदाज या सामन्यात दुखापतीमुळे खेळू शकणार नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

बंगळुरू येथे होणाऱ्या भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाचा स्टार फलंदाज शुबमन गिल पहिल्या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. शुबमन गिलच्या मानेला दुखापत असल्याने तो हा सामना खेळू शकणार नसल्याची माहिती समोर आली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, तो खेळण्यासाठी तंदुरुस्त व्हावा, यासाठी फिजिओ टीम प्रयत्न करत आहे. मात्र, या सामन्यात गिल खेळला नाही तर भारताला तिसऱ्या क्रमांकावर चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूला त्याच्या जागी प्लेईंग इलेव्हनमध्ये सामील करावे लागेल.

AUS vs PAK Pakistan won the ODI series in Australia after 22 years
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनी नोंदवला ऐतिहासिक विजय, भारताला मागे टाकत ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला आशियाई संघ
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
India vs South Africa 2nd T20 Highlights in Marathi
IND vs SA 2nd T20I Highlights : रोमांचक सामन्यात यजमानांनी हिरावला भारताच्या तोंडचा घास, ट्रिस्टन स्टब्सच्या वादळी खेळीने फेरले वरुण चक्रवर्तीच्या मेहनतीवर पाणी
AUS vs PAK Pakistan beat Australia by 8 wickets in the third ODI match
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात फडकावला झेंडा, वर्ल्ड चॅम्पियन संघाला घरच्या मैदानावर पाजलं पाणी
harris rauf celebrating wicket of glen maxwell
Pak vs Aus: भारताविरूद्धची तयारी पडली कांगारुंना भारी; पाकिस्तानने उडवला १४० धावात खुर्दा
nathan mcswinney
Ind vs Aus: भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाने दिली ‘या’ नव्या खेळाडूला संधी; पर्थ कसोटीसाठी केला संघ जाहीर
Sanju Samson breaks Dhoni record to become joint 7th Indian batter
Sanju Samson : संजू सॅमसनने धोनीला मागे टाकत केला खास पराक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला सातवा भारतीय
IND vs SA India National Anthem Witnesses Technical Glitch Ahead Of 1st T20I vs South Africa
IND vs SA सामन्यापूर्वी अचानक काही सेकंदात बंद झाले भारताचे राष्ट्रगीत, मग पुढे काय झालं? जाणून घ्या

हेही वाचा – Rohit Sharma on Mohammed Shami: “शमीला ऑस्ट्रेलियाला घेऊन जाणं शक्य नाही…”, रोहित शर्माने मोहम्मद शमीबद्दल केलं मोठं वक्तव्य, कर्णधार नेमकं काय म्हणाला?

शुबमन गिल पहिल्या कसोटीत खेळू शकला नाही, तर भारताला सर्फराझ खान आणि ध्रुव जुरेल यांच्यापैकी एकाला खेळवण्याची संधी मिळेल. या दोन्ही खेळाडूंनी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी केली होती. या दोघांनाही तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याचा अनुभव नाही. पण तरीही सर्फराझ खानला संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे. किंवा या सामन्यात केएल राहुलला तिसऱ्या क्रमांकावर खेळवण्याची शक्यताही आहे.

हेही वाचा – Rohit Sharma Ritika Sajdeh: रोहित शर्मा दुसऱ्यांदा होणार बाबा? पत्नी रितिका सजदेहचा ‘तो’ VIDEO व्हायरल

राहुल जर तिसऱ्या क्रमांकावर खेळला तर सर्फराझ सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. विराट कोहली चौथ्या क्रमांकावर आणि ऋषभ पंत पाचव्या क्रमांकावर खेळताना दिसेल. गतवर्षी यशस्वी जैस्वालच्या पदार्पणाने टीम इंडियाच्या फलंदाजीत बदल झाला होता. जैस्वाल कर्णधार रोहित शर्माचा सलामीचा जोडीदार ठरला. तर अनुभवी चेतेश्वर पुजाराच्या जागी शुबमन गिलला तिसऱ्या क्रमांकावर संधी मिळाली.

IND vs NZ: पहिल्या कसोटी सामन्यासाठी कशी असणार भारताची प्लेईंग इलेव्हन, रोहित शर्माने दिले उत्तर

रोहित शर्माने न्यूझीलंडच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी सांगितले की, भारतीय संघ बंगळुरू कसोटीत २ फिरकीपटूंसह खेळणार आहे आणि परिस्थितीनुसार तीन फिरकीपटूंसहही भारत खेळू शकतो. बंगळुरू कसोटीत पाचही दिवस पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. हे लक्षात घेता भारत या सामन्यात तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकी गोलंदाजांसह उतरण्याची शक्यता आहे. प्लेइंग इलेव्हनबाबत रोहित शर्मा सामन्यापूर्वी म्हणाला, “हे सर्व परिस्थितीवर अवलंबून असते. आज पाऊस पडला. खेळपट्टीवर कव्हर्स टाकले आहेत. आम्ही बुधवारी सकाळी तीन किंवा दोन वेगवान गोलंदाज आणि आमच्या सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनबाबत निर्णय घेऊ. आम्ही आमचे सर्व पर्याय खुले ठेवले आहेत.”

हेही वाचा – IND vs NZ Live Streaming: भारत-न्यूझीलंड कसोटी मालिका मोफत कुठे पाहता येणार? जाणून घ्या चॅनेल आणि सामन्याची वेळ

बेंगळुरू कसोटीसाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन –

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, सर्फराझ खान, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, आकाश दीप.