पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियाने रोनाल्डोने पत्रकार परिषदेदरम्यान कोका कोलाच्या बाटल्या बाजूला केल्याने ब्रँडला चांगलाच फटका बसला आहे. या कृतीमुळे कंपनीला तब्बल चार बिलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास २९ हजार ३५२ कोटींचं नुकसान झालं आहे. मात्र असं करणारा तो पहिला खेळाडू नाही. भारतातील दोन खेळाडूंना यापूर्वी सॉफ्ट ड्रिंक कंपनीच्या जाहिराती करण्यास नकार दिला आहे. आपल्या देशात अनेक खेळाडू सॉफ्ट ड्रिंक्सच्या जाहीराती करतात. यात अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. असं असताना दोन खेळाडूंनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून या जाहीराती करण्यास नकार दिला आहे. पैशांपेक्षा आरोग्य महत्त्वाचं असल्याचं संदेश त्यांनी दिला आहे. यात बॅडमिंटनपटू पुलेला गोपीचंद यांचं नाव आघाडीवर आहे. तर भारताचा कर्णधार विराट कोहलीही सॉफ्ट ड्रिंक कंपनीच्या जाहिराती करत नाही. पुलेला गोपिचंद यांची परिस्थिती हलाकीची असताना त्यांनी हा निर्णय घेतल्याने तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. गोपिचंद आपल्या आई वडिलांसह भाड्याच्या खोलीत राहत असूनही त्यांनी जाहिरात करण्यास नकार दिला आणि आपल्या निर्णयावर ठाम राहिले. त्यांच्या या निर्णयाचं सर्व स्तरातून कौतुक झालं होतं. पुलेला गोपिचंद आता भारताचे यशस्वी प्रशिक्षक आहेत. त्यांच्या तालमीत सायना नेहवाल आणि पी.व्ही. सिंधु यासारखे खेळाडू घडले आहेत.

पुलेला गोपिचंद यांनी २००१ साली पार पडलेल्या इंग्लंड चॅम्पियनशिप पुरुष गटाची बॅडमिंटन स्पर्धा जिंकली होती. प्रकाश पादुकोण यांच्यानंतर कामगिरी करणारे ते दुसरे खेळाडू होते. त्यामुळे त्यांच्याकडे जाहिरातींचा ओघ सुरु झाला होता. त्यानंतर एका सॉफ्ट ड्रिंक कंपनीने त्यांना ब्रँड अम्बेसेडरची ऑफर दिली होती. मात्र त्यांनी ती ऑफर नाकारली. “धुम्रपान करणं आणि दारू पिणं जितकं आरोग्यासाठी हानिकारक आहे. तितकंच सॉफ्ट ड्रिंक पिणे आरोग्याला घातक आहे. मी स्वत: सॉफ्ट ड्रिंक पित नाही आणि त्यासाठी इतरांना प्रेरीत करणार नाही. पुढेही माझा निर्णय असाच असेल.”, असं त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं.

Euro Cup: रोनाल्डोच्या ‘त्या’ एका कृतीमुळे कोका कोला कंपनीला जबर फटका; काही मिनिटांत २९ हजार कोटींचं नुकसान

पुलेला गोपीचंद याच्यासह भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीही सॉफ्ट ड्रिंकचं प्रमोशन करत नाही. सॉफ्ट ड्रिंक स्वत: पित नसल्याने इतरांना प्रेरीत करणार नाही, असा निर्णय त्याने घेतला आहे.

Story img Loader