पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियाने रोनाल्डोने पत्रकार परिषदेदरम्यान कोका कोलाच्या बाटल्या बाजूला केल्याने ब्रँडला चांगलाच फटका बसला आहे. या कृतीमुळे कंपनीला तब्बल चार बिलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास २९ हजार ३५२ कोटींचं नुकसान झालं आहे. मात्र असं करणारा तो पहिला खेळाडू नाही. भारतातील दोन खेळाडूंना यापूर्वी सॉफ्ट ड्रिंक कंपनीच्या जाहिराती करण्यास नकार दिला आहे. आपल्या देशात अनेक खेळाडू सॉफ्ट ड्रिंक्सच्या जाहीराती करतात. यात अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. असं असताना दोन खेळाडूंनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून या जाहीराती करण्यास नकार दिला आहे. पैशांपेक्षा आरोग्य महत्त्वाचं असल्याचं संदेश त्यांनी दिला आहे. यात बॅडमिंटनपटू पुलेला गोपीचंद यांचं नाव आघाडीवर आहे. तर भारताचा कर्णधार विराट कोहलीही सॉफ्ट ड्रिंक कंपनीच्या जाहिराती करत नाही. पुलेला गोपिचंद यांची परिस्थिती हलाकीची असताना त्यांनी हा निर्णय घेतल्याने तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. गोपिचंद आपल्या आई वडिलांसह भाड्याच्या खोलीत राहत असूनही त्यांनी जाहिरात करण्यास नकार दिला आणि आपल्या निर्णयावर ठाम राहिले. त्यांच्या या निर्णयाचं सर्व स्तरातून कौतुक झालं होतं. पुलेला गोपिचंद आता भारताचे यशस्वी प्रशिक्षक आहेत. त्यांच्या तालमीत सायना नेहवाल आणि पी.व्ही. सिंधु यासारखे खेळाडू घडले आहेत.
भारताचे ‘हे’ खेळाडू सॉफ्ट ड्रिंकची जाहिरात करत नाहीत
भारताच्या दोन खेळाडूंनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून सॉफ्ट ड्रिंकच्या जाहीराती करण्यास नकार दिला आहे. आरोग्य महत्त्वाचं असल्याचं संदेश त्यांनी दिला आहे.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 16-06-2021 at 18:58 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India pulele gopichand and virat kohali refused to advertise soft drinks rmt