India W vs Ireland W Register Highest 435 ODI Total: भारतीय महिला क्रिकेट संघाने आयर्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इतिहास रचला. टीम इंडियाने वनडे क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच ४०० धावांचा आकडा गाठला. भारताची यापूर्वीची सर्वोच्च धावसंख्या ३७० होती. परंतु राजकोट येथे स्मृती मानधना आणि प्रतिका रावल यांच्या शतकांच्या जोरावर टीम इंडियाने ४०० धावांचा टप्पा गाठला. भारताने ५० षटकांत ५ बाद ४३५ धावा केल्या आहेत.

वनडे क्रिकेटच्या इतिहासातील भारतीय पुरूष आणि महिला संघांमध्ये ही सर्वांत मोठी धावसंख्या आहे. यापूर्वी भारताच्या पुरूष संघाने ५ बाद ४१८ धावा वेस्ट इंडिजविरूद्ध २०११ मध्ये केल्या होत्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताच्या लेकींनी नवा इतिहास रचला. मानधनाने ८० चेंडूत १२ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने १३५ धावांची खेळी केली, तर प्रतिका रावलने सहाव्या एकदिवसीय सामन्यात १५४ धावांची खेळी खेळून आश्चर्यकारक कामगिरी केली.

Karun Nair ready to make a comeback to Indian team after scored 4 consecutive centuries in Vijay Hazare Trophy 2024-25
Karun Nair : त्रिशतकवीर आठ वर्षानंतर पुनरागमनासाठी सज्ज! सलग चार शतकं झळकावत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
14-year old Ira Jadhav slams 346 in U19 cricket breaks Smriti Mandhanas record against Meghalaya
Ira Jadhav : १५७ चेंडू, ३४६ धावा आणि ४२ चौकार…इरा जाधवने स्मृती मानधनाला मागे टाकत झळकावले विक्रमी त्रिशतक
IND W vs IRE W Jemimah Rodrigues century helps Indian womens team register highest ODI score against Ireland
IND W vs IRE W : जेमिमा रॉड्रिग्जच्या पहिल्यावहिल्या शतकाच्या जोरावर भारताने घडवला इतिहास, केला ‘हा’ खास पराक्रम
Mohammed Kaif Statement India Defeat Said You will beat Pakistan in Champions Trophy and will act like we are the best
“पाकिस्तानवर विजय मिळवाल अन्…”, भारताच्या कसोटी मालिका पराभवावर माजी क्रिकेटपटूने टीम इंडियाला सुनावलं
IND vs AUS 5 Big Reasons Why India Failed to Retain Border Gavaskar Trophy Against Australia
IND vs AUS: भारतीय संघावर १० वर्षांनी का ओढवली बॉर्डर गावस्कर ट्रॉफी गमावण्याची नामुष्की? वाचा भारताच्या पराभवाची कारणं
IND vs AUS 5th Test Australia need 162 runs win Sydney Test
IND vs AUS : बोलंडच्या दमदार गोलंदाजीसमोर पंतचे अर्धशतक पडले फिके, ऑस्ट्रेलियाला विजयासाठी मिळाले १६२ धावांचे लक्ष्य
Jasprit Bumrah breaks Bishan Singh Bedi's record during IND vs AUS Sydney Test
Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहने घडवला इतिहास! ऑस्ट्रेलियात ‘हा’ मोठा पराक्रम करणारा पहिलाच भारतीय गोलंदाज

हेही वाचा – Smriti Mandhana Century: स्मृती मानधनाचं वादळी शतक! वनडेमध्ये ‘ही’ कामगिरी करणारी पहिली भारतीय फलंदाज

भारताच्या महिला संघाने पहिल्यांदाच गाठला ४०० धावांचा आकडा

सलामी जोडीच्या शानदार शतकी खेळीमुळे भारतीय महिला क्रिकेट संघ ५० षटकांत ५ गडी गमावून ४३५ धावा करण्यात यशस्वी ठरला, जी वनडे क्रिकेटमधील भारताची आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी, भारतीय महिला संघाची सर्वोच्च वनडे धावसंख्या ३७० धावा होती, जी आयर्लंडविरुद्धच्या याच मालिकेतील दुसऱ्या सामन्यात आली होती.

हेही वाचा – INDW vs IREW: टीम इंडियाची युवा सलामीवीर प्रतिका रावलचं पहिलं वनडे शतक, भारतीय अंपायरच्या लेकीची धमाकेदार खेळी

भारताच्या पुरूष क्रिकेट संघालाही महिला संघाने टाकलं मागे

महिला वनडे क्रिकेटच्या इतिहासातील ही चौथी सर्वोच्च धावसंख्या आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा २८ वर्ष जुना विक्रम मोडित काढला. ऑस्ट्रेलियाने १९९७ मध्ये ३ गडी गमावून ४१२ धावा केल्या होत्या तर २०१८ मध्ये न्यूझीलंडने ४१३ धावा केल्या होत्या. यासह भारताने ४३५ धावा करत न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियालाही मागे टाकलं. इतकंच नव्हे तर भारताच्या चॅम्पियन पुरूष संघालाही महिला संघाने मागे टाकलं आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय पुरुष क्रिकेट संघाची सर्वात मोठी धावसंख्या ४१८/५ धावा आहे. पुरूष संघाने २०११ मध्ये इंदूरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ही धावसंख्या केली होती. आता भारतीय महिला क्रिकेट संघ या बाबतीत पुरुष संघाच्या पुढे गेला आहे.

हेही वाचा – IND vs ENG: भारत वि इंग्लंड टी-२० मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक एकाच क्लिकवर! जाणून घ्या सामन्याची नेमकी वेळ

https://x.com/BCCIWomen/status/1879464050381529463

भारताची वनडेमधील सर्वाेच्च धावसंख्या (पुरूष आणि महिला क्रिकेट संघ)

भारतीय महिला संघ५ बाद ४२३ धावा वि. आयर्लंड, राजकोट २०२५

भारतीय पुरूष संघ – ५ बाद ४१८ धावा वि. वेस्ट इंडिज, इंदोर २०११

भारतीय पुरूष संघ – ७ बाद ४१४ धावा वि. श्रीलंका, राजकोट २००९

भारतीय पुरूष संघ – ५ बाद ४१३ धावा वि. बर्मुडा, पोर्ट ऑफ स्पेन २००७

भारतीय पुरूष संघ – ४ बाद ४१० धावा वि. नेदरलँड्स, बंगळुरू २०२३

Story img Loader