पॅरिस : जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या भारताच्या सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने मंगळवारी फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. तसेच महिला दुहेरीत गायत्री गोपीचंद आणि ट्रीसा जॉली या भारतीय जोडीनेही स्पर्धेतील मोहिमेला यशस्वी सुरुवात केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुरुष एकेरीत पहिल्या फेरीच्या लढतीत अग्रमानांकित सात्त्विक-चिरागला मलेशियाच्या ओंग येव सिन-तेओ ए यी जोडीने अनपेक्षितपणे झुंजवले. मात्र, भारतीय जोडीने लढतीवरील नियंत्रण निसटू न देता विजयावर शिक्कामोर्तब केले. सात्त्विक-चिराग जोडीने ४७ मिनिटांत मलेशियाच्या जोडीचा २१-१३, २४-२२ असा पराभव केला. मलेशियन जोडीविरुद्ध गेल्या आठ सामन्यांत सात्त्विक-चिराग जोडीचा हा पाचवा विजय ठरला. 

हेही वाचा >>>शंभराव्या कसोटी सामन्यापूर्वी अश्विनने सांगितला कसोटी कारकिर्दीतला टर्निंग पॉईंट…

महिला दुहेरीतही ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद जोडीला भारताच्याच अश्विनी पोनप्पा आणि तनिशा क्रॅस्टो जोडीकडून कडवा प्रतिकार सहन करावा लागला.परंतु तीन गेमपर्यंत रंगलेली ही लढत गायत्री-ट्रीसा जोडीने १६-२१, २१-१९, २१-१७ अशी जिंकली.