India Scored 2nd Highest T20 Score IND vs SA: संजू सॅमसनचे दणदणीत शतक आणि तिलक वर्माच्या तुफानी शतकाच्या जोरावर भारतीय संघाने २८३ धावा करत मोठी धावसंख्या उभारली आहे. या दोघांनी मिळून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. संजू-तिलकच्या जोडीने खोऱ्याने धावा करत टी-२० मधील भारतासाठी दुसरी सर्वाेच्च धावसंख्या उभारली आहे. अभिषेक शर्माच्या विकेटनंतर या दोघांनी मिळून जोहान्सबर्गच्या मैदानावर चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. भारताकडून या सामन्यात तब्बल २३ षटकार मारले गेले. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर या दोन्ही खेळाडूंची फटकेबाजी पाहून चांगलेच दडपण आले होते आणि या दडपणात आफ्रिकेच्या गोलंदाजांनी अनेक वाईड आणि नो बॉल टाकले. या धावसंख्येबरोबरच संजू सॅमसन आणि तिलक वर्माने टी-२० मध्ये विक्रमी भागीदारी रचली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

इतकंच नव्हे तर संजू सॅमसन आणि तिलक वर्मा 20 षटकांनंतर नाबाद राहिले. संजू सॅमसनने ५६ चेंडूत ९ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने १०९ धावा केल्या तर तिलक वर्माने ४७ चेंडूत १० षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने १२० धावा केल्या. तर अभिषेक शर्माने बाद होण्यापूर्वी १८ चेंडूत ४ षटकार आणि २ चौकारांसह ३६ धावा केल्या. या तुफानी फटकेबाजीसह दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी १२० चेंडूत २८४ धावांची गरज आहे.

संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी मिळून टी-२० मधील सर्वात मोठी भागीदारी रचली आहे. या दोघांनी ८६ चेंडूत २१० धावांची विक्रमी भागीदारी केली. तिलक वर्माने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत सलग दुसरे टी-२० शतक केले आहे. तर संजूने दोन डक नंतर पुन्हा एकदा शतक केले आहे.

भारताची टी-२० मधील दुसरी सर्वाेच्च धावसंख्या

२९७/६ – भारत वि बांगलादेश – हैदराबाद २०२४
२८३/१ – भारत वि दक्षिण आफ्रिका – जोहान्सबर्ग २०२४
२७८/३ – अफगाणिस्तान वि आयर्लंड – डेहराडून २०१९
२६७/३ – इंग्लंड वि वेस्ट इंडिज – तारौबा – २०२३

भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय संघाच्या पथ्यावर पडला. दक्षिण आफ्रिकेकडून ७ गोलंदाजांनी गोलंदाजी केली. यापैकी फक्त मार्काे जान्सेनला एक विकेट घेता आली. बाकी सर्व गोलंदाजांची तिलक आणि संजूने चांगलीच कुटाई केली.