India Senior Players Refuse to Play Duleep Trophy Before Home Test Series: भारतीय संघाच्या न्यूझीलंडविरुद्धच्या कामगिरीनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. संघातील खेळाडूंच्या सरावावर त्यांच्या खेळण्याच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात होते. या मालिकेदरम्यानही दिग्गज आणि चाहते वारंवार एकच गोष्ट सांगत होते की, या मालिकेपूर्वी संघातील स्टार खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेट खेळायला हवे होते. सामन्याच्या सरावाचा अभाव खेळाडूंच्या कामगिरीत दिसून आला. बीसीसीआयची देखील हिच इच्छा होती की संघांतील खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेट खेळले पाहिजे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुनील गावस्करांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं की, ‘भारतीय संघातील खेळाडूंनी थोडा सराव करायला हवा होता. खूप काळानंतर खेळाडू मैदानावर उतरणार होते. आम्हाला माहित आहे की संघाने बांगलादेशला हरवले. यानंतर न्यूझीलंडला हरवणे सोपे जाईल असे वाटू लागले. न्यूझीलंडची कामगिरी अधिक चांगले होती त्यांचे खेळाडू भारतात आयपीएल खेळतात आणि येथील खेळपट्टी कशी असते हे त्यांना माहीत आहे.

हेही वाचा – टीम इंडियाच्या यष्टीरक्षक फलंदाजाने अचानक केली निवृत्तीची केली घोषणा, ‘या’ टूर्नामेंटनंतर क्रिकेटला करणार अलविदा

भारताच्या वरिष्ठ खेळाडूंचा दुलीप ट्रॉफी खेळण्यास दिलेला नकार, किवींविरूद्ध लाजिरवाण्या पराभवाचं हेच ठरलं कारण?

इंडियन एक्सप्रेसच्या मीडिया रिपोर्टनुसार, देशांतर्गत हंगाम सुरू होण्यापूर्वी बोर्डाने संघातील सर्वच खेळाडूंना दुलीप ट्रॉफीमध्ये खेळण्यास सांगितले होते. मात्र, त्यावेळी वरिष्ठ खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास नकार दिला होता. घरच्या मैदानावर होणाऱ्या कसोटी हंगामाच्या आधी, खेळाडूंनी मालिकेची तयारी म्हणून दुलीप ट्रॉफीमध्ये खेळत सामन्यांसाठी सराव करावा अशी निवड समितीची इच्छा होती, परंतु खेळाडूंनी पुरेस प्रोत्साहन न मिळाल्याने देशांतर्गत स्पर्धा खेळण्यास नकार दिला.

हेही वाचा – IND vs NZ: “सर्वांसाठी सारखेच नियम ठेवा…”, ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर रोहित शर्मा भडकला, खरंच पंत नॉट आऊट होता?

संघाचे वरिष्ठ खेळाडूही त्यांच्या सर्वाेत्तम कामगिरीची छाप पाडू शकले नाहीत. कर्णधार रोहित शर्मा आणि वरिष्ठ फलंदाज विराट कोहली यांनी निराश केले. या दोन्ही फलंदाजांसाठी ही मालिका फारच निराशाजनक ठरली. शेवटच्या 1१० डावांमध्ये कोहलीने १९२ धावा केल्या, तर शर्माने फक्त १३३ धावा केल्या आहेत. दोघांनीही गेले अनेक वर्ष देशांतर्गत क्रिकेट खेळलेले नाही. रोहित २०१५ मध्ये अखेरची रणजी ट्रॉफी स्पर्धा खेळला आहे. तर कोहली २०१२ मध्ये अखेरचा देशांतर्गत सामना खेळताना दिसला होता.

भारतीय संघाने जूनमध्ये टी-२० विश्वचषक जिंकला होता. यानंतर संघाला घरच्या मैदानावर बांगलादेशविरुद्ध मालिका खेळायची होती. अहवालानुसार, निवड समितीने बंगळुरू आणि अनंतपूर येथे होणाऱ्या दुलीप ट्रॉफी सामन्यांसाठी वरिष्ठ खेळाडूंसहित सर्वांनी उपलब्ध राहावे असा निर्णय घेतला होता. हे सामने ५ ते २२ सप्टेंबर दरम्यान होणार होते.

हेही वाचा – IND vs NZ: “एक कर्णधार व फलंदाज म्हणून मी…”, भारताच्या दारूण पराभवानंतर रोहित शर्माचं भावुक वक्तव्य; व्हाईट वॉशचं खापर कोणावर फोडलं?

बोर्डाच्या म्हणण्यानुसार, यामुळे खेळाडूंना मॅच सराव करता आला असता. रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासह टीम इंडियाच्या अनेक बड्या खेळाडूंनी याआधी सहमती दर्शवली होती. मात्र नंतर त्यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला. या खेळाडूंनी थेट बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळली आणि त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धची मालिका खेळली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि अश्विन हे दुलीप ट्रॉफीमध्ये सहभागी झाले नव्हते. त्यामुळे नंतर बोर्डाने रवींद्र जडेजालाही रिलीज केले, जो देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास तयार होता. शुबमन गिल, सर्फराज खान, ऋषभ पंत, यशस्वी जैस्वाल, केएल राहुल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी दुलीप ट्रॉफीमध्ये सहभाग घेतला. या सर्वच खेळाडूंनी गेल्या ५ कसोटी सामन्यांमध्ये कमीत कमी एका डावात तरी चांगली कामगिरी केली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India senior players refuse to play duleep trophy before home test series rohit sharma virat kohli ind vs nz bdg