India U19 vs New Zealand U19 Match Updates : अंडर-१९ विश्वचषकातील सुपर सिक्स स्पर्धेतील पहिला सामना ब्लोमफॉन्टेन येथील मंगाँग ओव्हल येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड आमनेसामने आहेत. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना मुशीर खानच्या शतकाच्या जोरावर ८ गडी गमावून २९५ धावांचा डोंगर उभारला. त्याचबरोबर न्यूझीलंडसमोर २९६ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

मुशीर खानचे या स्पर्धेतील हे दुसरे शतक ठरले. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातील या खेळीसह तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडूही ठरला. त्याने १०९ चेंडूत १० चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. त्याने १२६ चेंडूत १३१ धावांची खेळी साकारली आहे. तर, आदर्श सिंगने ५२ धावा केल्या. न्यूझीलंडकडून मेसन क्लार्कने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या.

Steve Smith Smashes 34th Test Century and 11th Hundred Against India Most By any Batter IND vs AUS
IND vs AUS: स्टिव्ह स्मिथचं ऐतिहासिक कसोटी शतक, भारताविरूद्ध ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज
IND vs AUS Usman Khawaja Reveals How He Stop Virat Kohli Sam Konstas Fight on Field Melbourne
IND vs AUS: “मी विराटला ओळखतो…,” कॉन्स्टास-कोहलीमध्ये मैदानात…
Mohammed Shami Fitness Update BCCI Informs He Recovered From Injury But Not Fit for IND vs AUS Last 2 Matches
Mohammed Shami: मोहम्मद शमी दुखापतीतून सावरला…, BCCI ने दिली मोठी अपडेट; ऑस्ट्रेलियाला जाणार की नाही? जाणून घ्या
Shreyas Iyer 40 Runs Inning Made Mumbai Win in Low Scoring Match vs Hyderabad Vijay Hazare Trophy
Shreys Iyer: श्रेयस अय्यरची कमाल, ९व्या क्रमांकावर फलंदाजीला आला अन् २० चेंडूत पालटला सामना; मुंबईचा दणदणीत विजय
Sam Constas statement about Indian bowlers sports news
भारतीय गोलंदाजांसाठी माझ्याकडे योजना तयार -कोन्सटास
IND vs AUS Isa Guha Racial Comment on Jasprit Bumrah During Gabba Test Called him primates
IND vs AUS: पुन्हा मंकीगेट प्रकरण? जसप्रीत बुमराहवर महिला कमेंटेटरने केली वर्णभेदात्मक टिप्पणी, गाबा कसोटीत नव्या वादाला फुटलं तोंड
IND vs AUS Australia all out on 445 runs
हेड-स्मिथच्या शतकाने भारताला गाबा कसोटीत टाकलं बॅकफूटवर, ऑस्ट्रेलियाने पहिल्याच डावात उभारला धावांचा डोंगर
suryansh shedge
Syed Mushtaq Ali Trophy 2024: सूर्यांश शेडगेची निर्णायक खेळी; सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत मुंबई ‘अजिंक्य’

टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. अर्शिन कुलकर्णी नऊ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर आदर्शने मुशीरसोबत दुसऱ्या विकेटसाठी ७७ चेंडूत ७७ धावांची भागीदारी केली. आदर्श ५८ चेंडूंत सहा चौकारांच्या मदतीने ५२ धावा करून बाद झाला. यानंतर कर्णधार उदय सहारनने मुशीरबरबर ८७ धावांची भागीदारी केली. मोठ्या फटकेबाजीच्या नादात उदयने आपली विकेट गमावली. तो ३४ धावा करून बाद झाला. यानंतर ठराविक अंतराने विकेट पडत राहिल्या. अरावेली अवनीश १७ धावा करून बाद झाला, प्रियांशू मोलिया १० धावा करून बाद झाला, सचिन दास १५ धावा करून बाद झाला.

हेही वाचा – IND vs ENG : ‘तो संघाच्या विजयात…’, सरफराजची टीम इंडियात निवड झाल्यावर त्याचे वडील झाले भावुक

मुशीर खानचे या स्पर्धेतील हे दुसरे शतक ठरले. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातील या खेळीसह तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडूही ठरला. त्याने १०९ चेंडूत १० चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. त्याने १२६ चेंडूत १३१ धावांची खेळी साकारली आहे.दोन शतकांशिवाय मुशीर खानने अर्धशतकही झळकावले आहे. त्याने या स्पर्धेत जवळपास ३०० धावा केल्या आहेत.

हेही वाचा – Deepti Sharma : क्रिकेटपटू दीप्ती शर्माचा गौरव; योगी सरकारकडून पोलीस दलातील ‘हे’ पद बहाल

मुशीरचा भाऊ सरफराज खानची भारतीय संघात निवड –

एकीकडे लहान भाऊ अंडर-१९ विश्वचषकात धुमाकूळ घालत आहे, तर दुसरीकडे रणजी स्टार आणि मुशीरचा मोठा भाऊ सरफराज खानचा कसोटीसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. खरं तर, या दिवसांत इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात सरफराजचा बदली खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे.

Story img Loader