ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात भारतीय फलंदाजांनी चांगली कामगिरी केली असली तरी सर्वच गोलंदाजांनी मात्र निराशा केली. त्यासाठी या गोलंदाजांना वगळून स्थानिक क्रिकेटमधील नवीन गुणवान गोलंदाजांचा शोध घ्यायला हवा, असे मत भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले आहे.
‘‘गेल्या दौऱ्यात भारतीय संघात सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, वीरेंद्र सेहवागसारखे फलंदाज होते, पण त्यांना चांगली कामगिरी करता आली नव्हती. पण यंदाच्या मालिकेत युवा फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. कोहलीशिवाय यापूर्वी कुणीही ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आले नव्हते, तरी त्यांच्याकडून चांगली कामगिरी पाहायला मिळाली. पण गोलंदाजांकडून वाईट कामगिरी झाली आणि याचाच परिणाम मालिकेवर झाला. भारतीय गोलंदाजांना ऑस्ट्रेलियाच्या २० फलंदाजांना बाद करणे जमलेच नाही,’’ असे गावस्कर म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 11th Jan 2015 रोजी प्रकाशित
नवीन गोलंदाज शोधायला हवेत – गावस्कर
ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात भारतीय फलंदाजांनी चांगली कामगिरी केली असली तरी सर्वच गोलंदाजांनी मात्र निराशा केली.
First published on: 11-01-2015 at 12:31 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India should look for a fresh set of bowlers sunil gavaskar