ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात भारतीय फलंदाजांनी चांगली कामगिरी केली असली तरी सर्वच गोलंदाजांनी मात्र निराशा केली. त्यासाठी या गोलंदाजांना वगळून स्थानिक क्रिकेटमधील नवीन गुणवान गोलंदाजांचा शोध घ्यायला हवा, असे मत भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले आहे.
‘‘गेल्या दौऱ्यात भारतीय संघात सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, वीरेंद्र सेहवागसारखे फलंदाज होते, पण त्यांना चांगली कामगिरी करता आली नव्हती. पण यंदाच्या मालिकेत युवा फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. कोहलीशिवाय यापूर्वी कुणीही ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आले नव्हते, तरी त्यांच्याकडून चांगली कामगिरी पाहायला मिळाली. पण गोलंदाजांकडून वाईट कामगिरी झाली आणि याचाच परिणाम मालिकेवर झाला. भारतीय गोलंदाजांना ऑस्ट्रेलियाच्या २० फलंदाजांना बाद करणे जमलेच नाही,’’ असे गावस्कर म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा