भारतीय क्रिकेट संघाची आयसीसीच्या ताज्या एकदिवसीय क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे, परंतु विराट कोहली मात्र फलंदाजांच्या यादीत अग्रस्थानावर विराजमान आहे.
श्रीलंकेने भारताचे दुसरे स्थान हिरावून घेतले आहे, तर ऑस्ट्रेलियाने अव्वल स्थान कायम राखले आहे. श्रीलंकेने इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत ३-२ असा विजय मिळवला. त्यामुळे श्रीलंकेला एक गुण मिळाला, तर भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांच्या खात्यावर ११२ गुण जमा झाले. पण अँजेलो मॅथ्यूजच्या संघाने भारताला मागे टाकले.
फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपले सहावे स्थान कायम राखले आहे. शिखर धवनची एका स्थानाने घसरण झाली असून, तो सध्या आठव्या स्थानावर आहे. रोहित शर्मा २०व्या स्थानावर आहे. गोलंदाजांच्या यादीत भारताचा एकमेव खेळाडू रवींद्र जडेजा पाचव्या स्थानावर आहे.

Story img Loader