India Squad Announced for IND vs BAN T20I Series: भारत आणि बांगलादेश यांच्यात ६ ऑक्टोबरपासून टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. संघाची कमान सूर्यकुमार यादव यांच्याकडे आहे. त्याचबरोबर यावेळी नितीश कुमार रेड्डीचाही या मालिकेसाठी संघात निवड करण्यात आली आहे. त्याचा प्रथमच संघात समावेश करण्यात आला आहे. त्याने आयपीएलमध्ये हैदराबादसाठी चमकदार कामगिरी केली होती. याचबरोबर मयंक यादवलाही संघात संधी मिळाली आहे.

मयांक यादवला पहिल्यांदाच संधी

Pat Cummins on Rishabh Pant ahead of Border Gavaskar Trophy 2024
विराट-रोहित नव्हे तर ‘या’ भारतीय खेळाडूची ऑस्ट्रेलियाला धास्ती; पॅट कमिन्स म्हणाला, “त्याला रोखावे लागेल नाही तर…”
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा…
IND vs BAN Jisko Jitna Run Banana Hai Bana Lo Sirf 1 Ghanta hai Rishabh Pant reveals Rohit Sharma message
IND vs BAN : ‘रोहित भाईने अगोदरच सांगून ठेवले होते की तुम्हाला…’, ऋषभ पंतने कर्णधाराच्या ‘त्या’ मेसेजबद्दल केला खुलासा
IND vs BAN 1st Test Mohammed sledging to Shanto
IND vs BAN सामन्यात गोंधळ! मोहम्मद सिराज बांगलादेशच्या कर्णधाराशी भिडला, बोट दाखवतानाचा VIDEO व्हायरल
India beat Bangladesh by 280 Runs in 1st Test Ravichandran Ashwin fifer Rishabh Pant Shubman Gill Centuries
IND vs BAN: भारताचा बांगलादेशवर ऐतिहासिक विजय, गेल्या ९२ वर्षांत कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडली अशी गोष्ट
Bangladesh Captain Big Statement Ahead of IND vs BAN test Series
IND vs BAN: “ते क्रमवारीत पुढे असले तरी…”, कसोटी मालिकेआधी बांगलादेशच्या कर्णधाराचं भारतीय संघाला आव्हान, नेमकं काय म्हणाला?
IND vs BAN Test Series updates in marathi
IND vs BAN : भारत दौऱ्यासाठी बांगलादेशचा कसोटी संघ जाहीर! हत्येचा आरोप असणारा खेळाडू संघात कायम
IND vs BAN Team India squad announced for 1st match against bangladesh
IND vs BAN : बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर! यश दयालसह ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी

बांगलादेशविरूद्ध टी-२० मालिकेसाठी मयांक यादवचाही संघात समावेश करण्यात आला आहे. आयपीएल 2024 मध्ये अप्रतिम कामगिरी करणाऱ्या मयंक यादवला संघात संधी मिळाली आहे. लखनौ सुपर जायंट्सकडून खेळणाऱ्या मयंकने ताशी १५० किलोमीटरहून अधिक वेगाने चेंडू टाकला आणि आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित करण्यात तो यशस्वी ठरला. दुखापतीमुळे तो बराच काळ मैदानाबाहेर होता, पण त्याने त्याच्या वेगवान गोलंदाजीच्या बळावर भारतीय संघात स्थान मिळवले आहे.

हेही वाचा – IPL 2025: BCCI चा ऐतिहासिक निर्णय, IPL मध्ये खेळाडूंना मॅच फी म्हणून मिळणार ७.०५ लाख, तर सर्व सामने खेळण्यासाठी मिळणार कोट्यवधी रूपये

वरुण चक्रवर्ती आणि जितेश शर्मा यांचं पुनरागमन

कोलकाता नाईट रायडर्सचा मिस्ट्री स्पिनर म्हणून समोर आलेला वरूण चक्रवर्तीला पुन्हा एकदा बारतीय संघात स्थान मिळालं आहे. गेल्या सीझनमध्ये कोलकातासाठी केलेल्या शानदार कामगिरीच्या जोरावर त्याने पुन्हा संधी मिळवली आहे. याचबरोबर जितेश शर्माचेही संघात पुनरागमन झाले आहे. दुसरा यष्टिरक्षक म्हणून त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचा – VIDEO: विराट कोहलीने केली बुमराहची नक्कल, जडेजाने पण दिली साथ; हे पाहून जसप्रीत बुमराहने दिली अशी प्रतिक्रिया


या खेळाडूंना दिला विश्रांती

बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी ऋषभ पंतला विश्रांती देण्यात आली आहे. भारताला आगामी काळात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. याचबरोबर यशस्वी जैस्वाल शुबमन गिल, अक्षर पटेल, कुलदीप यादव मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांनाही विश्रांती दिली आहे. पुढील कसोटी सामने लक्षात घेता या खेळाडूंच्या वर्कलोड मॅनेजमेंटसाठी विश्रांती देण्यात आली आहे. याशिवाय इशान किशनला पुन्हा संधी मिळालेली नाही. त्याने अलीकडेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली होती. तर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी टी-२० प्रकारातून विश्रांती घेतली आहे.

बांगलादेशविरूद्ध सामन्यात अभिषेक शर्माबरोबर सलामीला कोण उतरणार यावर सर्वांच्या नजरा असणार आहेत. ऋतुराज गायकवाडला या संघात संधी मिळाली नाही, नुकत्याच होणाऱ्या इराणी कपसाठी रेस्ट ऑफ इंडिया संघाचा कर्णधारही आहे.

हेही वाचा – Musheer Khan Health Update: मुशीर खानचा अपघातही ऋषभ पंतप्रमाणेच, अधिकृत माहिती आली समोर, मानेला फ्रॅक्चर असून मुंबईत होणार पुढील उपचार

बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ:

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा, अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि मयांक यादव.