येत्या १६ मार्च पासून सुरू होणाऱया टी-२० विश्वकरंडकासाठी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आज (शुक्रवार) बांगलादेशला रवाना झाला आहे.
भारतीय संघाचा पहिला सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी २१ मार्च रोजी रंगणार आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धा १६ मार्च ते ६ एप्रिल दरम्यान होणार आहे.
तसेच १७ आणि १९ मार्च रोजी भारतीय संघाचे टी-२० विश्वचषकासाठीचे सराव सामनेही होणार आहेत. भारतीय संघ या सराव सामन्यांत श्रीलंका आणि इंग्लंड विरुद्ध खेळणार आहे.
टी-२० विश्वचषकासाठीचा भारतीय संघ-
महेंद्रसिंह धोनी(कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, युवराज सिंह, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, आर.अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, स्टुअर्ट बिन्नी, अमित मिश्रा, मोहित शर्मा आणि वरुण एरॉन