Team India Squad West Indies Series : भारतीय क्रिकेट संघ आता वेस्ट इंडिज दौऱ्यावर (कॅरेबियन बेटं) जाणार आहे. येत्या १२ जुलैपासून उभय संघांमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाईल. त्यापाठोपाठ तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यापैकी कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट मालिकांसाठी बीसीसीआयने भारतीय संघांची घोषणा केली आहे. एकदिवसीय आणि कसोटी या दोन्ही मालिकांमध्ये रोहित शर्माच भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. कसोटीत अजिंक्य रहाणे उपकर्णधार असेल तर एकदिवसीय मालिकेत हार्दिक पांड्याकडे ही जबाबदारी असेल.

भारतीय क्रिकेट निवड समितीने दोन्ही मालिकांसाठी संतुलित संघांची निवड केली आहे. या संघांमध्ये अनुभवी आणि युवा खेळाडूंना सधी देण्यात आली आहे. तर तीन दिग्गजांना विश्रांती दिली आहे. कसोटी संघातून चेतेश्वर पुजारा, उमेश यादव आणि मोहम्मद शमीला विश्रांती दिली आहे. तर ऋतुराज गायकवाड, मुकेश कुमार, जयदेव उनादकट, नवदीप सैनी आणि इशान किशनला १६ सदस्यीय संघात संधी देण्यात आली आहे.

maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
India vs South Africa 2nd T20 Highlights in Marathi
IND vs SA 2nd T20I Highlights : रोमांचक सामन्यात यजमानांनी हिरावला भारताच्या तोंडचा घास, ट्रिस्टन स्टब्सच्या वादळी खेळीने फेरले वरुण चक्रवर्तीच्या मेहनतीवर पाणी
nathan mcswinney
Ind vs Aus: भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाने दिली ‘या’ नव्या खेळाडूला संधी; पर्थ कसोटीसाठी केला संघ जाहीर
shams mulani
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा: मुंबईकडून ओडिशाचा डावाने धुव्वा
Maharashtra coach Sulakshan Kulkarni regretted the loss of victory sports news
निराशाजनक पराभवामुळे आव्हान खडतर! विजय निसटल्याची महाराष्ट्राचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांना खंत
thane district senior citizen home voting
ठाणे जिल्ह्यात गृहमतदानाला सुरुवात
Sanju Samson breaks Dhoni record to become joint 7th Indian batter
Sanju Samson : संजू सॅमसनने धोनीला मागे टाकत केला खास पराक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला सातवा भारतीय

भारताच्या एकदिवसीय संघात आक्रमक फलंदाज आणि यष्टीरक्षक संजू सॅमसनचं पुनरागमन झालं आहे. तसेच ऋतुराज गायकवाड आणि कुलदीप यादवला संधी दिली गेली आहे. मुकेश कुमार हा जलदगती गोलंदाजही निळ्या जर्सीत दिसणार आहे.

भारताचा कसोटी संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनादकट, नवदीप सैनी.

हे ही वाचा >> IND vs WI Test Team : वेस्ट इंडिज दौऱ्यावर BCCI कडून अजिंक्य रहाणेवर मोठी जबाबदारी, ऋतुराजसाठी गूड न्यूज!

भारताचा एकदिवसीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल. कुलदीप यादव, जयदेव उनादकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार.