आधीच्या सामन्यात अमेरिकेला हरवणाऱ्या भारताच्या पुरुष हॉकी संघाने ग्रेट ब्रिटनचा ३-१ अशा फरकाने पराभव केला आहे. या विजयामुळे हॉकी जागतिक लीगच्या उपांत्य फेरीसाठी भारताचा आत्मविश्वास दुणावला आहे.
भारताने पहिल्याच मिनिटाला मध्यरक्षक गुरबज सिंगने गोलचे खाते उघडले. त्यानंतर देविंदर वाल्मीकीने १२व्या मिनिटाला भारताच्या खात्यावर दुसऱ्या गोलची भर घातली. मग २०व्या मिनिटाला आकाशदीप सिंगने भारताचा तिसरा गोल नोंदवला. ०-३ अशा पिछाडीवर पडलेल्या गेट्र ब्रिटनने २८व्या मिनिटाला एकमेव गोल केला.
भारताच्या बचावपटूंनी अप्रतिम कामगिरी केली आणि प्रतिस्पर्धी संघाला पेनल्टी कॉर्नर करण्याची संधीच दिली नाही.