India T-20 Wins in 2022: आशिया चषक २०२२ मध्ये भारतीय क्रिकेट संघाची निराशाजनक खेळी पाहिल्यावर ऑस्ट्रेलिया समोर विजयी होणे हे मेन इन ब्लूसाठी आवश्यक होते. यातही पहिला सामना पराभवच पत्करावा लागल्याने भारतीय क्रिकेटप्रेमींची निराशा झाली होती मात्र त्यापाठोपाठ भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दोन्ही सामन्यात विजय प्राप्त करून भारताने मालिका जिंकली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची चमकदार कामगिरी त्यांना या वर्षातील सर्वात महत्त्वाचा विजय मिळवून गेली. एकीकडे ऑस्ट्रेलियाचा पराभव करताच आता रोहित ब्रिगेडने पाकिस्तानलाही मोठा दणका दिला आहे. टी २० खेळप्रकारात टीम इंडिया आता जगात भारी संघ ठरला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध या विजयासह भारताने एका वर्षात T20I क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवण्याचा विश्वविक्रम मोडला आहे. रविवारी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या T20I मधील विजय हा भारताचा २०२२ मधील T20I मधील २१ वा विजय होता. आतापर्यंत हा विजय पाकिस्तानच्या नावे होता. पाकिस्तानने २०२१ सालात तब्बल २० टी-२० सामने जिंकले होते. आता २१ वा विजय मिळवत भारत यंदाच्या सर्वाधिक टी २० सामने जिंकणार संघ बनला आहे. भारताने विजय प्राप्त केलेल्या २१ सामन्यांपैकी १० सामने हे मायदेशी खेळले गेले होते.

भारताने आजवर जिंकलेले टी-२० सामने

आजवर वेस्ट इंडिजच्या विरुद्ध सात सामने, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध प्रत्येकी दोन, श्रीलंकेच्या विरुद्ध तीन, आयर्लंड मध्ये दोन व आशिया चषकातील तीन सामने भारताने जिंकले आहेत.

Deepti Sharma Reaction Video: आम्ही चार्ली डीनला आधीच सांगून.. दिप्ती शर्माने केलं मोठं विधान

भारताने आजवर गमावलेले टी-२० सामने

भारताने २०२२ मध्ये आतापर्यंत २९ पैकी २१ टी-20 सामने जिंकले आहेत. २०२२ मध्ये भारताने आशिया चषक स्पर्धेत दोन सामने गमावले, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानात खेळताना दोन सामने तर ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड विरुद्ध प्रत्येकी १ सामना आजवर भारताने गमावला आहे.

दरम्यान हे वर्ष भारतीय संघासाठी खरोखरच खास ठरले. या वर्षाच्या सुरुवातीला, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारताने आणखी एक विक्रम केला होता. अफगाणिस्तान आणि रोमानियाच्या विरुद्ध सलग १२ विजयांसह भारत सर्वाधिक T20 विजय मिळवणारा संघ ठरला होता.