भारत- न्यूझीलंड दरम्यान सुरू असलेल्या कसोटीच्या तिस-या दिवशी भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडचा दुसरा डाव अवघ्या १०५ धावांत गुंडाळला आहे. यापूर्वी भारताने पहिल्या दिवशीच्या चार बाद १३० या धावसंख्येवरून दुस-या दिवशीच्या खेळाला सुरूवात केली. त्यानंतर अवघ्या ७२ धावांत उर्वरित फलंदाज तंबूत परतल्यामुळे भारताला अवघ्या २०२ धावांची मजल मारता आली. मात्र, पहिल्या डावात ३०१ धावांनी पिछाडीवर पडलेल्या भारतीय संघावर न्यूझीलंडने फॉलोऑन न लादण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी कमाल करत फलंदाजीसाठी आलेल्या न्यूझीलंडचा अवघ्या १०५ धावांत खुर्दा उडवला. त्यामुळे विजयासाठी भारतासमोर आता ४०७ धावांचे लक्ष्य असून तिस-या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने एका विकेटच्या मोबदल्यात ८७ धावा केल्या आहेत.
विजयासाठी भारतासमोर ४०७ धावांचे लक्ष्य
भारत- न्यूझीलंड दरम्यान सुरू असलेल्या कसोटीच्या तिस-या दिवशी भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडचा दुसरा डाव अवघ्या १०५ धावांत गुंडाळला आहे.
First published on: 08-02-2014 at 11:27 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India to chase 407 after bundling out kiwis for