भारतातील फुटबॉल रसिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारताला आणखी एका फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेच्या आयोजनाची संधी मिळाली आहे. भारताला २०२० मध्ये होणाऱ्या फिफाच्या अंडर-१७ महिला फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याची संधी मिळाली आहे. शुक्रवारी फिफाकडून ही घोषणा करण्यात आली.

मियामीमध्ये झालेल्या फिफाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याआधी भारताने पुरुषांच्या फिफा अंडर-१७ फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले होते. भारतात महिलांची अंडर-१७ फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धा होत असल्याने फुटबॉलच्या जागतिक नकाशावर भारतीय महिला फुटबॉल संघाला छाप उमटवण्याची संधी आहे.

स्पेनच्या महिला फुटबॉल संघाने गत अंडर-१७ वर्ल्डकप स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. २०१८ साली उरुग्वेमध्ये झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत स्पेनच्या संघाने मेक्सिकोच्या महिला संघाचा पराभव करुन जेतेपद मिळवले होते. त्यावेळी न्यूझीलंड आणि कॅनडाचा संघ अनुक्रमे  तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर राहिला होता.

Story img Loader