चेन्नई : आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत यापूर्वीच उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करणारा भारतीय संघ आज, बुधवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध निर्विवाद वर्चस्व राखण्याचे ध्येय बाळगून मैदानावर उतरेल. मैदानावरील कौशल्यापेक्षाही या सामन्यात खेळाडूंच्या मानसिकतेचा अधिक कस लागणार आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील प्रत्येक सामन्याच्या निकालाशी देशवासीयांच्या भावना जोडल्या गेलेल्या असतात. त्यामुळे या सामन्याविषयी नेहमीच उत्कंठा ताणली जाते. हा सामनाही याला अपवाद नसेल. स्पर्धेतील दोन्ही संघाच्या कामगिरीतील फरक म्हणजे भारतीय संघ आतापर्यंत खेळलेल्या चार सामन्यांत अपराजित असून पाकिस्तान अजूनही विजयाच्या शोधात आहे. साहजिकच स्पर्धेतील पुढील प्रवासासाठी पाकिस्तानला या सामन्याच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे.

operation lotus
‘ऑपरेशन लोटस’वरून आरोप-प्रत्यारोप; चंद्रशेखर बावनकुळेंच्या दाव्याचे नाना पटोलेंकडून खंडन
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Nana Patole
Nana Patole : “आमचे सर्व खासदार…”, महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’च्या चर्चांवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया
India Alliance News
INDIA Alliance : इंडिया आघाडी महाराष्ट्रातील निकालांविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार, भाजपाने ईव्हीएममध्ये फेरफार केल्याचा आरोप कायम
parliament congress protest
‘इंडिया’चा दबाव झुगारून काँग्रेसचे आंदोलन
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
India vs Australia Border Gavaskar Trophy Australia dominate in second Test sport news
पिछाडीनंतर पडझड, भारतीय फलंदाजांकडून निराशाच; हेडच्या शतकामुळे ऑस्ट्रेलियाचा दबदबा

भारताविरुद्धचा विजय पाकिस्तानला उपांत्य फेरीत स्थान मिळवून देईल. मात्र, पाकिस्तानला या सामन्यात पराभव पत्करावा लागला, तर त्यांना अन्य सामन्यांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. यामध्ये चीनने जपानवर विजय मिळवायला हवा. जपानने विजय मिळवल्यास गोलफरक कमी असणे आवश्यक असेल. त्याचबरोबर दुसरीकडे मलेशियाने कोरियाला मोठय़ा फरकाने पराभूत केल्यास पाकिस्तानला फायदा होणार आहे. एकूणच पाकिस्तानला मैदानात उतरताना या सर्व समीकरणांचाही विचार करावा लागणार आहे.

भारत आणि पाकिस्तानने प्रत्येकी तीन वेळा आशियाई चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. जागतिक क्रमवारीत भारतीय संघ पाकिस्तानपेक्षा वरच्या क्रमांकावर आहे. त्यामुळे संभाव्य विजेत्यांच्या यादीत भारतालाच पहिली पसंती मिळत आहे. भारताने या वेळी प्रत्येक सामन्यात आपल्या आक्रमक खेळाचे दर्शन घडवले आहे. यापूर्वी भारताकडून अभावानेच असा खेळ केला जायचा. पासेस आणि शॉर्ट कॉर्नरच्या खेळात भारताने प्रगती केली आहे. भारताला आपल्या बचावात सुधारणा करण्यास वाव आहे. यावर भारताने लक्ष देणे गरजेचे आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील सामना मैदानाबरोबर प्रेक्षकांमध्येही खेळला जात असतो. म्हणूनच या सामन्यामधील तीव्रता अधिक असते. साहजिकच खेळाडूंवरील दडपण आणि प्रेक्षकांमधील ताण प्रत्येक मिनिटाला वाढत असतो. त्यामुळे या दडपणाचा यशस्वी सामना करणाऱ्या संघाला विजयाची अधिक संधी असेल.

’ वेळ : रात्री ८.३० वा.

’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स फर्स्ट, सिलेक्ट २

आम्हाला बचावात सुधारणा करण्याची गरज आहे. प्रतिस्पर्धी संघाला आमच्यापेक्षा अधिक पेनल्टी कॉर्नर मिळणार नाहीत, याची आम्हाला काळजी घ्यावा लागेल. पाकिस्तानच्या आक्रमकपटूंना कसे रोखायचे याबाबत परिपूर्ण नियोजन करावे लागेल. – हरमनप्रीत सिंग, भारताचा कर्णधार 

Story img Loader