भारतीय पुरुष फुटबॉल संघ पॅलेस्टाइनबरोबर ऑक्टोबरमध्ये दोन मैत्रीपूर्ण फुटबॉल सामने खेळणार असल्याचे अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने बुधवारी जाहीर केले.
फिफा क्रमवारीत भारतीय संघ १५१ व्या स्थानावर असून पॅलेस्टाइनचा संघ ८५व्या स्थानावर आहे.ऑक्टोबर महिन्यात पहिला सामना ६ तारखेला, तर दुसरा सामना ९ तारखेला खेळवण्यात येणार आहेत, पण या सामन्यांचे स्थळ अजून ठरवण्यात आलेले नाही. भारताचा २३-वर्षांखालील फुटबॉल संघ पाकिस्तानविरुद्ध १७ आणि २० ऑगस्ट रोजी दोन मैत्रीपूर्ण सामने खेळणार आहे.

Story img Loader