भारतीय संघ २०१५ नंतर प्रथमच बांगलादेशचा दौरा करणार आहे. दोन्ही संघात ४ डिसेंबरपासून तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यांसाठी करणार आहे, अशी घोषणा बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) गुरुवारी केली. एकदिवसीय सामने ४, ७ आणि १० डिसेंबर रोजी मीरपूर, ढाका येथील शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जातील.

कसोटी सामने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग असणार आहेत. भारत आणि बांगलादेश संघातील कसोटी मालिकेतील पहिला सामना १४ ते १८ डिसेंबर दरम्यान चट्टोग्राम येथे खेळला जाईल. तसेच २२ ते २६ डिसेंबर दरम्यान दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामना ढाका येथे पार पडेल.

बीसीबी अध्यक्ष नझमुल हसन यांनी एका निवेदनात म्हटले की, “बांगलादेश-भारत सामन्यांनी आम्हाला अलीकडच्या इतिहासातील काही सर्वोत्तम सामने दिले आहेत. तसेच दोन्ही देशांचे चाहते आणखी एका संस्मरणीय मालिकेची वाट पाहत आहेत.”

हेही वाचा : T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियन विश्वचषक संघात कॅमेरॉन ग्रीनची एन्ट्री, जोश इंग्लिसच्या जागी मिळाली संधी

नझमुल हसन पुढे म्हणाले, “वेळापत्रक निश्चित करण्यासाठी बीसीबी सोबत जवळून काम केल्याबद्दल, मी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे आभार मानतो. आम्ही भारतीय संघाचे बांगलादेशात स्वागत करण्यास उत्सुक आहोत.”

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी मालिकेच्या महत्त्वावर भर दिला. ते म्हणाले, “भारत-बांगलादेश सामन्यांची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. बांगलादेशमधील चाहते किती उत्कट आहेत हे आम्हाला माहीत आहे आणि मला खात्री आहे की त्यांना व्हाईट बॉल आणि रेड बॉल क्रिकेट दोन्ही प्रकारातील काही रोमांचक स्पर्धांमध्ये सहभागी करून घेतले जाईल.”

Story img Loader