IND vs AUS 4th Test : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीमध्ये भारताने पहिल्या दिवसअखेर ४ बाद ३०३ अशी भक्कम धावसंख्या उभारली. चेतेश्वर पुजाराने आपला फॉर्म कायम राखत या सामन्यातही शतक ठोकले. ऑस्ट्रेलियामध्ये एका कसोटी मालिकेत ३ शतक झळकावणारा तो तिसरा भारतीय फलंदाज ठरला. याशिवाय नवोदित मयंक अग्रवालनेही ७७ धावांची शानदार खेळी करत आपली निवड पुन्हा एकदा सार्थ ठरवली. सध्या पुजारा १३० धावांवर तर हनुमा विहारी ३९ धावांवर नाबाद आहे.

सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी घेतली. पण भारतीय संघाची सुरुवात अडखळती झाली. संघात पुन्हा संधी मिळालेल्या लोकेश राहुलला अवघ्या ९ धावाच करता आल्या. जॉश हेजलवूडने त्याला माघारी पाठवले. नवोदित मयंक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजारा यांनी डाव सावरला. त्यामुळे उपहारापर्यंत भारताने एका गड्याच्या मोबदल्यात ६९ धावांपर्यंत मजल मारली. दुसऱ्या सत्रात मयंक ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ७७ धावा करून झेलबाद झाला. दुसऱ्या विकेटसाठी त्याने पुजारासोबत ११६ धावांची भागीदारी रचली. चेतेश्वर पुजाराने कर्णधार विराट कोहलीला हाताशी घेत डाव पुढे नेला. पुजाराने अर्धशतक पूर्ण करत चहापानापर्यंत भारताला २ गड्यांच्या मोबदल्यात १७७ धावांपर्यंत मजल मारून दिली. शेवटच्या सत्रात आधी कर्णधार कोहली २३ धावांवर आणि काही कालावधीने उपकर्णधार अजिंक्य रहाणे १८ धावांवर तंबूत परतले. त्यानंतर विहारी आणि पुजारा यांनी दिवसअखेरपर्यंत किल्ला लढवला.

Live Blog

12:33 (IST)03 Jan 2019
पुजाराचा झंझावात सुरूच; पहिल्या दिवसअखेर भारत ४ बाद ३०३

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीमध्ये भारताने पहिल्या दिवसअखेर ४ बाद ३०३ अशी भक्कम धावसंख्या उभारली. चेतेश्वर पुजाराने आपला फॉर्म कायम राखत या सामन्यातही शतक ठोकले. सध्या पुजारा १३० धावांवर तर हनुमा विहारी ३९ धावांवर नाबाद आहे.

11:26 (IST)03 Jan 2019
पुजारा Unstoppable! ठोकले मालिकेतील तिसरे शतक

चेतेश्वर पुजाराने आपला फॉर्म कायम राखत या सामन्यातही शतक ठोकले. ऑस्ट्रेलियामध्ये एका कसोटी मालिकेत ३ शतक झळकावणारा तो तिसरा भारतीय फलंदाज ठरला.

11:13 (IST)03 Jan 2019
अजिंक्य रहाणे माघारी, भारताला चौथा धक्का

अजिंक्य रहाणे माघारी, भारताला चौथा धक्का

10:42 (IST)03 Jan 2019
३ गड्यांच्या मोबदल्यात भारताची द्विशतकी मजल

भारताने तिसऱ्या सत्रात द्विशतकी मजल मारली, पण त्यासाठी भारताला ३ गडी गमवावे लागले. राहुल, अग्रवाल आणि कर्णधार कोहली तिघे तंबूत परतले.

10:11 (IST)03 Jan 2019
चहापानानंतर भारताला तिसरा धक्का, कोहली माघारी

जॉश हेजलवूडने दिला भारताला तिसरा धक्का

09:41 (IST)03 Jan 2019
चेतेश्वर पुजाराचं अर्धशतक, भारताची सामन्यावर पकड

चहापानापर्यंत भारत २ गड्यांच्या मोबदल्यात १७७

08:32 (IST)03 Jan 2019
भारताला दुसरा धक्का, मयांक अग्रवाल माघारी

चांगली सुरुवात केल्यानंतरही तिचं शतकात रुपांतर करण्यात मयांक अग्रवाल अपयशी ठरला आहे. नॅथन लॉयनच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळण्याच्या नादात मयांक मिचेल स्टार्ककडे झेल देऊन माघारी

08:11 (IST)03 Jan 2019
मयांक अग्रवालचं अर्धशतक

मयांक अग्रवालकडून ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा समर्थपणे सामना

07:08 (IST)03 Jan 2019
उपहारापर्यंत भारत ६९/१

चेतेश्वर पुजारा आणि मयांक अग्रवाल यांच्यातील अर्धशतकी भागीदारीमुळे भारताचा डाव सावरला

06:21 (IST)03 Jan 2019
मयांक अग्रवाल - चेतेश्वर पुजारा जोडीने भारताचा डाव सावरला

दोघांनीही भारताला ५० धावसंख्या ओलांडून दिली आहे

06:20 (IST)03 Jan 2019
भारताला पहिला धक्का, लोकेश राहुलची अपयशाची मालिका सुरुच

जॉश हेजलवूडच्या गोलंदाजीवर शॉन मार्शकडे झेल देऊन लोकेश राहुल माघारी

06:20 (IST)03 Jan 2019
नाणेफेक जिंकून भारताची प्रथम फलंदाजी

तिसऱ्या कसोटीत संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेल्या लोकेश राहुलला या सामन्यात भारतीय संघात स्थान मिळाले आहे.

Story img Loader