भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत चौथ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ४ बाद १०४ धावांपर्यंत मजल मारली. पहिले चार गडी झटपट गमावल्यानंतर शॉन मार्श आणि ट्रेव्हिस हेड या जोडीने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला आणि संघाला शतकी मजल मारून दिली. आता भारताला विजयासाठी ६ बळींची  गरज आहे तर ऑस्ट्रेलियाला २१९ धावांची आवश्यकता आहे. या सामन्याचा केवळ एका दिवसाचा खेळ शिल्लक राहिला असल्याने सामन्यात रंगत आली आहे.

त्याआधी भारताने दुसऱ्या डावात सर्वबाद ३०७ धावांपर्यंत मजल मारली आणि ऑस्ट्रेलियापुढे सामना जिंकण्यासाठी ३२३ धावांचे आव्हान ठेवले. फिरकीपटू नॅथन लॉयन याने १२२ धावांच्या मोबदल्यात ६ गडी बाद केले आणि भारताच्या धावसंख्येला लगाम लावला. भारताकडून चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या दोघांनी अर्धशतके ठोकली आणि भारताला समाधानकारक आघाडी मिळवून दिली.

३ बाद १५१ या धावसंख्येवरुन आज भारताच्या डावाला सुरुवात झाली. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे जोडीने भारताच्या खात्यात धावसंख्येची भर घालत डावाला आकार दिला. दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारीही झाली. अखेर नॅथन लॉयनने पुजारा (७१) आणि त्यापाठोपाठ रोहित शर्माचा (१) अडसर दूर करत भारताला दोन धक्के दिले. पण पुजारा आणि अजिंक्य रहाणे या दोघांनी आपली अर्धशतके पूर्ण केली. उपहारानंतर मात्र भारताचा डाव गडगडला. ऋषभ पंत (२८), अश्विन (५), रहाणे (७०), शमी (०) आणि इशांत शर्मा हे पाच गडी भारताने झटपट गमावले. दुसऱ्या डावात लॉयनच्या ६ गड्यांव्यतिरिक्त स्टार्कने ३ तर हेजलवूडने १ गडी माघारी धाडला.

Live Blog

13:11 (IST)09 Dec 2018
सामन्यात रंगत; भारताला विजयासाठी ६ बळींची गरज

भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत चौथ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ४ बाद १०४ धावांपर्यंत मजल मारली. पहिले चार गडी झटपट गमावल्यानंतर शॉन मार्श आणि ट्रेव्हिस हेड या जोडीने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला आणि संघाला शतकी मजल मारून दिली. आता भारताला विजयासाठी ६ गडींची आवश्यकता आहे तर ऑस्ट्रेलियाला २१९ धावांची गरज आहे. या सामन्याचा केवळ एक दिवसाचा खेळ शिल्लक राहिला असल्याने सामना रंगतदार स्थितीमध्ये आला आहे.

12:55 (IST)09 Dec 2018
हेड-मार्शने सावरले, ऑस्ट्रेलियाची शतकी मजल

४ गडी झटपट बाद झाल्यानंतर आता शॉन मार्श आणि ट्रेव्हिस हेड या जोडीने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला आणि संघाला शतकी मजल मारून दिली.

12:14 (IST)09 Dec 2018
पीटर हॅंड्सकाॅंब बाद, ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का

शमीने टाकलेला उसळता चेंडू पीटर हॅंड्सकाॅंबला टोलवता आला नाही. बॅटच्या वरच्या टोकाला चेंडू लागून तो झेलबाद झाला आणि ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का बसला.

11:16 (IST)09 Dec 2018
उस्मान ख्वाजा झेलबाद, ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का

उस्मान ख्वाजा झेलबाद, ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का

10:49 (IST)09 Dec 2018
ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का, हॅरिस २६ धावांवर माघारी

मोहम्मद शमीने ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का दिला. सलामीवीर हॅरिस २६ धावांवर माघारी परतला.

10:09 (IST)09 Dec 2018
फिंच बाद, चहापानापर्यंत ऑस्ट्रेलिया १ बाद २८

फिरकीपटू अश्विनने सलामीवीर फिंचला बाद करत ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. फिंच ११ धावांवर माघारी परतला. त्यामुळे चहापानांपर्यंत ऑस्ट्रेलियाआजी धावसंख्या १ बाद २८ अशी झाली.

09:06 (IST)09 Dec 2018
लॉयनने केली भारताची 'शिकार'; ऑस्ट्रेलियापुढे ३२३ धावांचे लक्ष्य

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात भारताने सर्वबाद ३०७ धावांपर्यंत मजल मारली आणि ऑस्ट्रेलियापुढे सामना जिंकण्यासाठी ३२३ धावांचे ठेवले. फिरकीपटू नॅथन लॉयन याने १२२ धावांच्या मोबदल्यात ६ गडी बाद केले आणि भारताच्या धावसंख्येला लगाम लावला.

08:52 (IST)09 Dec 2018
अश्विन, रहाणे पाठोपाठ शमी तंबूत; भारताच्या डावाला उतरती कळा

अश्विन आणि रहाणे बाद झाल्यानंतर पाठोपाठ शमीही तंबूत परतला. पहिल्याच चेंडूवर त्याने हवेत उंच फटका मारला

08:49 (IST)09 Dec 2018
अजिंक्य रहाणे ७० धावांवर बाद, भारताचा आठवा गडी माघारी

अजिंक्य रहाणे ७० धावांवर बाद, भारताचा आठवा गडी माघारी

08:44 (IST)09 Dec 2018
अश्विन झेलबाद, भारताला सातवा धक्का

अश्विन झेलबाद, भारताला सातवा धक्का

08:23 (IST)09 Dec 2018
उपहारानंतर भारताला पहिला धक्का, ऋषभ पंत बाद

लॉयनला सामन्यात आणखी एक यश, भारताचा सहावा गडी माघारी

07:47 (IST)09 Dec 2018
उपहारापर्यंत भारत २६०/५

भारताकडे २७५ धावांची आघाडी, अजिंक्य रहाणे-ऋषभ पंत जोडी खेळपट्टीवर कायम

07:16 (IST)09 Dec 2018
रोहित शर्मा स्वस्तात माघारी

लॉयनच्या गोलंदाजीवर हँडस्काँबने घेतला झेल, भारताचा निम्मा संघ माघारी

07:12 (IST)09 Dec 2018
अजिंक्य रहाणेला सूर गवसला, झळकावलं दमदार अर्धशतक

पुजारा माघारी परतल्यानंतर अजिंक्य रहाणेने आपलं अर्धशतक झळकावत संघाच्या आघाडीमध्ये भर घालण्याचं काम सुरुच ठेवलं आहे

07:03 (IST)09 Dec 2018
अखेर भारताची जमलेली जोडी फुटली, पुजारा माघारी

नॅथन लॉयनच्या गोलंदाजीवर पुजारा झेलबाद, दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी

06:36 (IST)09 Dec 2018
चेतेश्वर पुजाराचं अर्धशतक

पुजारा-रहाणेची चौथ्या विकेटसाठी महत्वाची भागीदारी

05:57 (IST)09 Dec 2018
पुजारा-रहाणे जोडीची सावध सुरुवात

भारताची आघाडी २०० धावांच्या पलीकडे

Story img Loader