कर्णधार विराट कोहलीचे धडाकेबाज शतक (१०४ धावा) आणि महेंद्रसिंह धोनीच्या (५५ धावा) अर्धशतकी खेळीमुळे टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा ४ चेंडू व ६ विकेट राखून विजय मिळवला. फलंदाजीस पोषक असलेल्या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा घेतलेला निर्णय ऑस्ट्रेलियाला लाभदायक ठरला नाही. शॉन मार्शचे (१३१ धावा) शतक वाया गेले. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या सामन्यात टीम इंडियाने बाजी मारली. अखेरच्या षटकात ७ धावांची गरज होती. धोनीने पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला आणि नंतरच्या चेंडूवर एकेरी धाव घेत संघाला विजय मिळवून दिला. तीन सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने दुसरा सामना जिंकून बरोबरी साधली आहे. पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. त्यामुळे कसोटी मालिकेसह एकदिवसीय मालिका जिंकण्याचे टीम इंडियाचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, विराट कोहलीला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
ऑस्ट्रेलियाचे २८८ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या टीम इंडियाच्या शिखर धवन आणि रोहित शर्मा जोडगळीने आक्रमक सुरूवात केली होती. रोहितपेक्षा शिखर आक्रमक होता. परंतु, चेंडू फटकवण्याच्या नादात धवन ३२ धावांवर बाद झाला. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या विराटबरोबर रोहितची जोडी चांगली जमली होती. रोहितही फटके मारण्याच्या नादात ४३ धावांवर बाद झाला. अंबाती रायडूनेही बऱ्यापैकी फलंदाजी केली. त्याने २४ धावा केल्या.
विराटने महेंद्रसिंह धोनीला हाताशी घेत आक्रमक पवित्रा घेतला. त्याने आपल्या कारकीर्दीती ३९ वे तर ऑस्ट्रेलियाविरूद्धचे सहावे शतक पूर्ण केले. त्याने आपल्या खेळीत ५ चौकार व २ षटकार लगावले. तो खेळपट्टीवर असेपर्यंत धोनीने दुय्यम भूमिका स्वीकारली होती. शतकानंतर कोहली लगेचच बाद झाला. त्यानंतर धोनीने आपला पवित्रा बदलला. त्याने दिनेश कार्तिकच्या साहाय्याने धावांचा यशस्वी पाठलाग केला. ऑस्ट्रेलियाकडून बेहरेनड्रॉफ, रिचर्ड्सन, स्टॉयनिस आणि मॅक्सवेल यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
तत्पूर्वी, शतकवीर शॉन मार्श (१३१ धावा), ग्लेन मॅक्सवेलच्या (४८ धावा) आक्रमक फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने निर्धारित ५० षटकात टीम इंडियाला २९९ धावांचे आव्हान दिले. ऑस्ट्रेलियाने ९ बाद २९८ धावा केल्या. नॅथन लायनने भुवनेश्वर कुमारच्या अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकला. टीम इंडियाकडून भुवनेश्वर कुमारने १० षटकांत ४५ धावा देत ४ बळी टिपले. त्याला मोहम्मद शमीने ३ बळी घेत चांगली साथ दिली. रवींद्र जडेजाला एक गडी बाद करता आला. कुलदीप यादव आणि आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजला आपला प्रभाव पाडता आला नाही.
कर्णधार विराट कोहली (१०४ धावा) शतकानंतर लगेचच बाद झाला. रिचर्डसनला डिप मिडविकेटला फटकवण्याच्या प्रयत्नात त्याचा उंच उडालेला झेल मॅक्सवेलने टिपला. विराट बाद झाल्यामुळे टीम इंडिया संकटात सापडली आहे. दिनेश कार्तिक मैदानात आला असला तरी धोनीवर सर्वांच्या आशा आहेत. ४५ षटकांत टीम इंडियाने २५५ धावा केल्या आहेत. धोनी ३७ धावांवर खेळत आहे.
कर्णधार विराट कोहलीने आपल्या कारकीर्दीतील ३९ वे शतक ठोकले. ऑस्ट्रेलियाविरूद्धचे त्याचे हे सहावे शतक ठरले. त्याने १०८ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. सामना रंगतदार अवस्थेत पोहोचला असून टीम इंडियाला विजयासाठी ४५ चेंडूत ६५ धावांची आवश्यकता आहे.
टीम इंडियाने ४२ षटकात ३ बाद २२८ धावा केल्या आहेत.
विराट कोहली ९९ धावांवर तर धोनी १७ धावांवर खेळत आहे.
अंबाती रायडू बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने खेळाची सूत्रे आपल्या हाती घेतले आहेत. अर्धशतकानंतर विरोटनेही आक्रमक धोरण स्वीकारले असून तो ८५ धावांवर खेळत आहे. धोनीने सध्या त्याला साथ देण्याचे धोरण अवलंबलेले आहे. टीम इंडियाने ३७ षटकांत ३ बाद २०३ धावा केल्या आहेत.
कोहलीबरोबर अर्धशतकी भागीदारी झाल्यानंतर अंबाती रायडूही ग्लेन मॅक्सवेलला डीप मिडविकेटला उत्तुंग फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. स्टॉयनिसने २३ धावांवर रायडूचा झेल टिपला.
मॅक्सवेलच्या ३१ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर कोहलीने २ धावा घेत आपले अर्धशतक पूर्ण केले.
टीम इंडियाच्या २५ षटकांत २ बाद १३२ धावा केल्या आहेत. कोहली ३५ तर रायडू १४ धावांवर खेळत आहे.
धवन बाद झाल्यानंतर टीम इंडियाला सावरणाऱ्या रोहित शर्माचे अर्धशतक थोडक्यात हुकले. ४३ धावांवर असताना मार्क स्टॉयनिसच्या चेंडुला सीमारेषेबाहेर धाडण्याच्या प्रयत्नात उडालेला त्याचा झेल डीप फॉरवर्ड स्क्वेअरला पीटर हँड्सकोम्बने टिपला. टीम इंडियाने १९ षटकांत २ बाद १०३ धावा केल्या आहेत.
टीम इंडियाने १६ षटकांत १ बाद ८७ धावा केल्या आहेत. रोहित शर्मा ३२ तर कर्णधार विराट कोहली १९ धावांवर खेळत आहेत.
शिखर धवन बाद झाल्यानंतर शर्मा-कोहली जोडी संयमी खेळाचे प्रदर्शन करत आहे. १३ षटकांत टीम इंडियाने १ बाद ६६ धावा केल्या आहेत. शर्मा २१ धावांवर तर कोहली ८ धावांवर खेळत आहे.
लयात आलेल्या शिखर धवनने फटकेबाजीच्या नादात आपली विकेट गमावली. जेसन बेहरेनड्रॉफच्या गोलंदाजीवर चौकार मारल्यानंतर पुढचा चेंडू फटकवण्याच्या प्रयत्नात त्याचा उंच उडालेला झेल मिडविकेटला उस्मान ख्वाजाने टिपला. भारताच्या ८ षटकांत १ बाद ४८ धावा झाल्या आहेत.
रोहित शर्मापेक्षा डावखुरा शिखर धवन आक्रमक खेळताना दिसतोय. ७ षटकांत टीम इंडियाने बिनबाद ४१ धावा केल्या आहेत. शिखर धवन २७ तर रोहित शर्मा ९ धावांवर खेळत आहे.
रोहित शर्मा आणि शिखर धवन ही टीम इंडियाची सलामीची जोडी फलंदाजीस पोषक असलेल्या खेळपट्टीचा पुरेपूर फायदा घेताना दिसत आहे. ४ षटकांत टीम इंडिया बिनबाद १५ धावांवर आहे. रोहित शर्मा ८ तर शिखर धवन ७ धावांवर खेळत आहे.
२९९ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या टीम इंडियाला पहिल्या षटकांत अवघी एकच धाव काढता आली. दुसऱ्या षटकांत मात्र मागील सामन्यातील शतकवीर रोहित शर्माने २ चौकार ठोकले.
शतकवीर शॉन मार्श (१३१ धावा), ग्लेन मॅक्सवेलच्या (४८ धावा) आक्रमक फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने निर्धारित ५० षटकात टीम इंडियाला २९९ धावांचे आव्हान दिले आहे. ऑस्ट्रेलियाने ९ बाद २९८ धावा केल्या. नॅथन लायनने भुवनेश्वर कुमारच्या अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकला. टीम इंडियाकडून भुवनेश्वर कुमारने १० षटकांत ४५ धावा देत ४ बळी टिपले. त्याला मोहम्मद शमीने ३ बळी घेत चांगली साथ दिली. रवींद्र जडेजाला एक गडी बाद करता आला. कुलदीप यादव आणि आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजला आपला प्रभाव पाडता आला नाही.
अखेरच्या षटकांमध्ये भुवनेश्वन कुमार आणि मोहम्मद शमीने ऑस्ट्रेलियाने एकापाठोपाठ ४ विकेट घेतल्या निर्धारित ५० षटकांत ऑस्ट्रेलियाने ९ बाद २९८ धावा केल्या. भारताला विजयासाठी २९९ धावांची आवश्यकता आहे.
टीम इंडियाचा गोलंदाज भुवनेश्वर कुमारने आक्रमक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल (४८ धावा) आणि शतकवीर शॉन मार्शला (१३१ धावा) तंबूत धाडले. मॅक्सवेलला आपले अर्धशतक पूर्ण करता आले नाही. ऑसीने ४८ षटकांत ७ बाद २८४ धावा केल्या.
ऑस्ट्रेलिया ४७ षटकांत ५ बाद २८१ धावा
शॉन मार्श १३० तर मॅक्सवेल ४८ धावांवर खेळत आहे.
आक्रमक फलंदाजी करत असलेल्या मॅक्सवेलचा झेल रोहित शर्माने सोडला. सिराज पुन्हा एकदा इथे दुर्दैवी ठरला. मॅक्सवेल यावेळी ४१ धावांवर खेळत होता. त्यानंतरच्या पुढच्या चेंडूवर त्याने चौकार लगावला.
एकदिवसीय सामन्यात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजने आक्रमक फलंदाज मॅक्सवेलला पायचित बाद केले. पंचांनी त्याला बादही दिले. मात्र मॅक्सवेलने रिव्ह्यू घेतला. त्यात मॅक्सवेल नाबाद ठरला. यामुळे सिराजचे पहिला आंतरराष्ट्रीय बळी घेण्याचे स्वप्न लांबले. सिराजच्या या षटकात मॅक्सवेलने २ चौकार तर मार्शने १ चौकार ठोकला. ऑस्ट्रेलियाने ४४ षटकांत ५ बाद २४७ धावा केल्या आहेत.
मार्क स्टॉयनिस बाद झाल्यानंतर फलंदाजीस आलेल्या ग्लेन मॅक्सवेलने आक्रमक फलंदाजी केली. त्याने चौकार आणि षटकार लगावून संघाला वेगवान धावा जमवून दिल्या.
डावखुरा फलंदाज शॉन मार्शने शानदार शतक झळकावत ऑस्ट्रेलियाला सुस्थितीत आणले. एकवेळ सलग २ विकेट गेल्याने अडचणीत आलेल्या संघाला त्याने आपल्या सहकारी फलंदाजांच्या साथीने सावरले. फिरकीपटू कुलदीप यादवच्या चेंडूवर एक चौकार आणि एकेरी धाव घेत त्याने आपल्या कारकिर्दीतील सातवे शतक ठोकले. ऑस्ट्रेलियाच्या ४१ षटकांत ५ बाद २१४ धावा झाल्या आहेत. मार्शने उस्मान ख्वाजा, हँड्सकोम्ब, स्टॉयनिस यांच्याबरोबर अर्धशतकी भागीदारी केली.
मोहम्मद शमीने ऑस्ट्रेलियाच्या मार्श-स्टॉयनिस जमलेली जोडी फोडली. सलग २ चौकार मारणाऱ्या स्टॉयनिस शमीच्या गोलंदाजीवर चकला. चेंडू बॅटची कड घेऊन यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीच्या हाती विसावला. स्टॉयनिसने ३६ चेंडूत २९ धावा केल्या. मार्श-स्टॉयनिसने अर्धशतकी भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाने ३८ षटकांत ५ बाद १९५ धावा केल्या आहेत. मार्श ९२ धावांवर खेळत आहे.
ऑस्ट्रेलियाने ३२ षटकांत ४ बाद १५४ धावा केल्या आहेत. शॉन मार्श ६९ धावांवर तर मार्क स्टॉययनिस १२ धावांवर खेळत आहेत. भारताकडून भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला आहे. उस्मान ख्वाजा धावबाद झाला आहे.
यष्टींमागे आपण अजूनही चपळ असल्याचे धोनीने आज पुन्हा एकदा दाखवून दिले. फिरकीपटू रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर त्याने चपळाई दाखवत पीटर हँड्सकोम्बला यष्टीचीत केले. हँड्सकोम्बचा स्वीप करण्याचा प्रयत्न फसला आणि चेंडू धोनीच्या हाती विसावला. धोनीने क्षणाचीही उसंत न घेता हँड्सकोम्बच्या यष्ट्या उडवल्या. हँड्सकोम्बने पंचांच्या इशाऱ्याचीही वाट न पाहता तंबूची वाट धरली. हँड्सकोम्बने २२ चेंडूत २० धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने २९ षटकांत ४ बाद १३५ धावा केल्या आहेत.
डावखुरा फलंदाज शॉन मार्शने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने संयमी खेळी करत ऑस्ट्रेलियन संघाला सावरले. भारताविरोधातील त्याचे हे चौथे अर्धशतक आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या ऑस्ट्रेलियाने २२ षटकांत ३ बाद १०५ धावा केल्या आहेत. सुरूवातीच्या धक्क्यानंतर शॉन मार्शने उस्मान ख्वाजाच्या साथीने डाव सावरला. शॉन मार्श ४३ धावांवर तर पीटर हँड्सकोम्ब १२ धावांवर खेळत आहे.
रवींद्र जडेजाच्या अप्रतिम क्षेत्ररक्षणामुळे स्थिरावलेला उस्मान ख्वाजा धावबाद झाला. ख्वाजाने २३ चेंडूत २१ धावा केला. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न त्याला चांगलाच महागात पडला. कव्हर पाँईंटला उभ्या असणाऱ्या जडेजाने अचूक चेंडू फेकून ख्वाजाला धावबाद केले. ख्वाजा आणि मार्शने सुरूवातीच्या धक्क्यानंतर डाव सावरत अर्धशतकी भागीदारी केली.
सुरूवातीला बसलेल्या लागोपाठ दोन धक्क्यानंतर शॉन मार्श आणि उस्मान ख्वाजा या डावखुऱ्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. मार्श २८ तर ख्वाजा २१ धावांवर खेळत आहे. संघाच्या १८ षटकांत २ बाद ८१ धावा.
ऑस्ट्रेलियाने १५ षटकांत २ बाद ६१ धावा केल्या आहेत. उस्मान ख्वाजा १५ धावांवर तर शॉन मार्श १६ धावांवर खेळत आहेत. भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी १ बळी घेतला आहे.
ऑस्ट्रेलिया- ११ षटकांत २ बाद ४१ धावा
शॉन मार्श - ६ धावा
उस्मान ख्वाजा- ६ धावा
लागोपाठच्या दोन षटकांत ऑस्ट्रेलियाला दोन धक्के बसले. मोहम्मद शमीने अॅलेक्स कॅरीला १८ धावांवर बाद केले. ८ षटकांत ऑस्ट्रेलियाच्या २ बाद २६ धावा झाल्या आहेत. सलामीची जोडी स्वस्तात तंबुत परतली.
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने आपल्या चौथ्या आणि संघाच्या आठव्या शतकात ऑस्ट्रेलियन कर्णधार आरोन फिंचचा ६ धावांवर त्रिफळा उडवला
ऑस्ट्रेलिया-
५ षटकांत बिनबाद १४ धावा
आरोन फिंच २, अॅलेक्स कॅरी १० धावा
तीन षटकात ऑस्ट्रेलियाच्या बिनबाद ९ धावा. आरोन फिंच शून्यावर तर अॅलेक्स कॅरी ७ धावांवर खेळत आहे.
भारतीय संघात मोहम्मद सिराजला संधी देण्यात आली आहे. हा एकमेव बदल करण्यात आला आहे. सिराजचा हा पहिला एकदिवसीय सामना आहे. यापूर्वी त्याने टी-२० सामना खेळला आहे. तर ऑस्ट्रेलियाचा मागील सामन्यातील संघच कायम आहे.
अॅडलेड येथील खेळपट्टी फलंदाजीस पोषक. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघास चांगली कामगिरी करण्याची संधी
आस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला