गुरुवारी म्हणजेच 6 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारताने आपल्या 12 जणांच्या संघाची घोषणा केली आहे. अॅडलेडच्या मैदानावर हा सामना खेळवला जाईल. इंग्लंड दौऱ्यात अखेरच्या कसोटी सामन्यांमध्ये यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळणाऱ्या ऋषभ पंतवर भारताने पुन्हा एकदा यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवली आहे. याचसोबत गेल्या काही महिन्यांमध्ये वन-डे व टी-20 सामन्यात आक्रमक कामगिरी करणाऱ्या रोहित शर्मालाही 12 जणांच्या संघात स्थान देण्यात आलंय.

पहिल्या कसोटी सामन्यासाठी असा असेल भारतीय संघ –

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उप-कर्णधार), लोकेश राहुल, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन आश्विन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह</p>

Story img Loader