महेंद्रसिंह धोनी आणि केदार जाधवने झळकावलेल्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने अखेरच्या वन-डे सामन्यात ऑस्ट्रेलियावर 7 गडी राखून मात केली आहे. याचसोबत भारताने 3 वन-डे सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली आहे, कसोटी मालिकेपाठोपाठ भारताने वन-डे मालिकेतही बाजी मारत ऑस्ट्रेलियाला चारीमुंड्या चीत केलं आहे. भारताचा ऑस्ट्रेलियातला हा पहिलाच वन-डे मालिका विजय ठरला आहे, त्यामुळे भारताच्या या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला ऐतिहासिक महत्व प्राप्त झालं आहे.
महेंद्रसिंह धोनीने 87 तर केदार जाधवने 61 धावांची खेळी केली. या दोघांनीही चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं आहे. ऑस्ट्रेलियाकडून रिचर्डसन-सिडल आणि स्टॉयनिस यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला. सामन्यात 6 बळी घेणाऱ्या युझवेंद्र चहलला सामनावीर तर दोन सामन्यात भारताच्या विजयात महत्वाचा वाटा उचलणाऱ्या महेंद्रसिंह धोनीला मालिकावीराच्या किताबाने गौरवण्यात आलं.
याआधी अखेरच्या सामन्यात संधी मिळालेल्या फिरकीपटू युझवेंद्र चहलने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने तिसऱ्या सामन्यात धडाकेबाज सुरुवात केली. ऑस्ट्रेलियालाला 230 धावांवर रोखण्यात भारतीय संघाला यश आलं. युझवेंद्र चहलने सामन्यात 5 बळी घेत भारताचं पारडं जड राखण्यात मोठी भूमिका बजावली. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्विकारलेल्या भारतीय गोलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला.
भुवनेश्वर कुमारने दोन्ही सलामीवीरांना माघारी धाडत ऑस्ट्रेलियाला धक्के दिले. यानंतर शॉन मार्श आणि उस्मान ख्वाजा यांनी भागीदारी रचत ऑस्ट्रेलियन संघाचा डाव सावरला. मात्र शॉन मार्श माघारी परतल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाचा डाव पुन्हा एकदा कोलमडला. युझवेंद्र चहलने ऑस्ट्रेलियाची मधली फळी आपल्या भेदक माऱ्याने कापून काढली. मधल्या फळीत पिटर हँडस्काँबने भारतीय गोलंदाजांचा समर्थपणे सामना करत अर्धशतक झळकावलं. मात्र तो माघारी परतल्यानंतर इतर फलंदाज फारसा तग धरु शकले नाहीत. अखेरीस 230 धावांत ऑस्ट्रेलियाचा संघ गारद झाला. भारताकडून युझवेंद्र चहलने सर्वाधिक 6 बळी घेतले. त्याला भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमीने 2-2 बळी घेत चांगली साथ दिली.
केदार जाधवने चौकार मारत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. 3 सामन्यांच्या मालिकेत भारत 2-1 ने विजयी
केदारनेही ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा समाचार घेत अर्धशतक साजरं केलं
कोहली माघारी परतल्यानंतर धोनीने केदार जाधवला हाताशी धरत आपलं अर्धशतक साजरं केलं आहे. यामुळे सामन्यात भारताचं आव्हान अद्याप कायम राहिलं आहे
रिचर्डसनच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक कॅरीने घेतला विराटचा झेल
भारताचे दोन्ही सलामीवीर माघारी परतल्यानंतर धोनी आणि कोहलीने संघाचा डाव सावरला आहे. या दोघांमध्ये झालेल्या भागीदारीमुळे भारताने 100 धावसंख्येचा टप्पाही ओलांडला
मार्कस स्टॉयनिसने पकडला धवनचा झेल
पिटर सिडलच्या गोलंदाजीवर रोहित शर्मा झेलबाद
भारताला विजयासाठी 231 धावांचं आव्हान
ऑस्ट्रेलियाचा नववा फलंदाज बाद, चहलच्या खात्यात सहावा बळी
युझवेंद्र चहलचे सामन्यात पाच बळी, भारताचं सामन्यावर वर्चस्व
केदार जाधवने घेतला रिचर्डसनचा झेल, चहलचा सामन्यातला चौथा बळी
महत्वाचे फलंदाज माघारी परतल्यानंतर हँडस्काँबने एक बाजू लावून धरत आपलं अर्धशतक साजरं केलं आहे.
फटकेबाजी करत मॅक्सवेल भारतीय गोलंदाजांपुढे आव्हान उभं करत होता, मात्र शमीच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात मॅक्सवेल माघारी
चहलच्या गोलंदाजीवर स्लिपमध्ये रोहित शर्माने घेतला स्टॉयनिसचा सुरेख झेल
एक धाव काढण्याच्या नादात उस्मान ख्वाजा चहलकडे सोपा झेल देऊन माघारी, कांगारुंचा चौथा गडी माघारी
चहलच्या गोलंदाजीवर पुढे येऊन खेळण्याच्या नादात शॉन मार्श यष्टीचित. ऑस्ट्रेलियाची जमलेली जोडी फुटली
दोन्ही फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांचा समर्थपणे सामना करत संघाला आश्वासक धावसंख्या उभारुन दिली
उस्मान ख्वाजा-फिंच जोडीकडून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न, मात्र भुवनेश्वरने फिंचला पायचीत करुन माघारी धाडलं
भुवनेश्वर कुमारने घेतला केरीचा बळी
सामन्यावर पावसाचं सावट मात्र कायम
भुवनेश्वर कुमारने अवघा एक चेंडू टाकल्यानंतर सामन्यात पावसाचं पुनरागमन झाल्याने सामना थांबवण्यात आला आहे
भारताच्या संघात ३ बदल करण्यात आले आहेत. मोहम्मद सिराज याच्या जागी अष्टपैलू विजय शंकरला संघात स्थान मिळाले आहे. अंबाती रायडूच्या जागी केदार जाधवला संघात घेण्यात आले आहे. तर कुलदीप यादवच्या जागी युझवेन्द्र चहलला संघात संधी देण्यात आली आहे.
भारताने निर्णायक सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकरली आहे.
पावसामुळे सामना सुरू होण्यास उशीर होत आहे.
३ सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना यजमान ऑस्ट्रेलियाने जिंकला, तर दुसरा सामना भारताने जिंकला. त्यामुळे तिसरा सामना निर्णायक ठरणार आहे. या सामन्यात विजय शंकर याला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे.