कर्णधार इयॉन मॉर्गन आणि जो रुट यांनी केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर इंग्लंडने अखेरच्या वन-डे सामन्यात विजय मिळवून मालिका २-१ च्या फरकाने जिंकली आहे. भारताने दिलेलं २५७ धावांचं आव्हान इंग्लंडने ८ गडी राखून पूर्ण केलं. इंग्लंडचे दोन्ही सलामीवीर माघारी परतल्यानंतर जो रुट आणि इयॉन मॉर्गन यांनी भारतीय गोलंदाजीचा नेटाने सामना केला. भारताने कमी धावसंख्येचं आव्हान दिल्यामुळे दोन्ही फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी न करता भागीदारी रचण्याकडे भर दिला. या भागीदारीच्या जोरावर दोन्ही फलंदाजांनी भारताला सामन्यात बॅकफूटवर ढकललं. दोघांनीही तिसऱ्या विकेटसाठी १८६ धावांची भागीदारी केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
इंग्लंडची ही जमलेली जोडी फोडण्याचा भारतीय कर्णधार विराट कोहलीने प्रयत्न केला, मात्र त्याला यात यश लाभलं नाही. भारताच्या प्रत्येक गोलंदाजांना इंग्लंडचे फलंदाजांनी संयमाने खेळून काढलं. जो रुटने सामन्यात नाबाद १०० तर कर्णधार इयॉन मॉर्गनने नाबाद ८८ धावांची खेळी केली. भारताकडून शार्दुल ठाकूरला सामन्यात एकमेव बळी मिळाला.
तत्पूर्वी मधल्या फळीतल्या फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे भारतीय संघ पुन्हा एकदा संकटात सापडला. हेडिंग्लेच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारताने ५० षटकांत ८ गडी गमावत २५६ धावांपर्यंत मजल मारली. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनचा निर्णय त्याच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. सलामीवीर रोहित शर्मा या सामन्यातही अपयशी ठरला. यानंतर शिखर धवन आणि विराट कोहली जोडीने भारताचा डाव सावरला. मात्र शिखर धवन माघारी परतल्यानंतर भारतीय डावाची पुन्हा एकदा घसरगुंडी उडाली. दुसऱ्या सामन्यात संथ खेळीमुळे टीकेचा धनी बनलेल्या महेंद्रसिंह धोनीलाही आजच्या सामन्यात फारशी चमक दाखवता आलेली नाही. अखेरच्या षटकांमध्ये शार्दुल ठाकूरने फटकेबाजी करत भारताला २५० धावांचा टप्पा ओलांडून दिला.
इंग्लंडकडून डेव्हिड विली आणि आदिल रशिद यांनी प्रत्येकी ३-३ बळी घेतले. त्यांला मार्क वूडने १ बळी घेत चांगली साथ दिली. याआधी झालेल्या ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ अशी बाजी मारली होती. १ ऑगस्टपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाहीये. त्यामुळे या मालिकेत कोणता संघ बाजी मारतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Live Blog

Highlights
- 20:30 (IST)
शारà¥à¤¦à¥à¤² ठाकूरची फटकेबाजी
???????? ?????????? ??????? ??????? ????????. ??? ??????????? ?????????? ?????? ?????, ??????? ??????? ??? ??????? ?????
- 18:47 (IST)
विराट कोहलीचं अरà¥à¤§à¤¶à¤¤à¤•
??????????? ??????????? ????????? ?????? ??? ????? ??????? ??????? ??????? ???
हेडिंग्लेच्या मैदानात खेलवल्या जाणाऱ्या अखेरच्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी सलामीवीर जेसन रॉयला विश्रांती देऊन जेम्स विन्स या खेळाडूला इंग्लंडच्या संघात जागा देण्यात आली आहे.

भारतीय गोलंदाजीला पुरते उरुन रुट-मॉर्गन जोडीची नाबाद धावांची शतकी भागीदारी. संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब. इंग्लंडने मालिका २-१ ने जिंकली. सलग दुसऱ्या सामन्यात जो रुटचं शतक.
जो रुटपाठोपाठ इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनचंही अर्धशतक. इंग्लंडची विजयाच्या दिशेने वाटचाल. दोघांमध्येही तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी.
जो रुट आणि कर्णधार इयॉन मॉर्गन यांच्यात अर्धशतकी भागीदारी. इंग्लंडचा डाव सावरला. भारतीय गोलंदाजीचा नेटाने सामना करत जो रुटचं अर्धशतक
ठराविक अंतराने इंग्लंडच्या दुसऱ्या फलंदाजाला माघारी धाडण्यात भारताला यश. जेम्स विन्स धावचीत होऊन माघारी परतला.
शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर बेअरस्टो रैनाकडे झेल देत माघारी. इंग्लंडचा पहिला गडी माघारी
जेम्स विन्स आणि जॉनी बेअरस्टो जोडीकडून डावाची आक्रमक सुरुवात. बेअरस्टोची मैदानात चौफेर फटकेबाजी
इंग्लंडला विजयासाठी २५७ धावांचं आव्हान, डेव्हिड विलीच्या शेवटच्या चेंडूवर भुवनेश्वर कुमार बाद
अखेरच्या षटकांमध्ये शार्दुल ठाकूरची फटकेबाजी. बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर लगावले षटकार, भारताने ओलांडला २५० धावांचा टप्पा
अखेरच्या षटकांमध्ये भुवनेश्वर कुमारच्या साथीने धोनीचा धावगती वाढवण्याचा प्रयत्न. मात्र डेव्हिड विलीच्या गोलंदाजीवर धोनी माघारी.
भारतीय संघाची घसरगुंडी सुरुच. हार्दिक पांड्या मार्क वुडच्या गोलंदाजीवर जोस बटलरकडे झेल देत माघारी
आदिल रशिदच्या गोलंदाजीवर जो रुटने झेल पकडत भारताला पाचवा धक्का दिला आहे. दुसऱ्या सामन्याप्रमाणेच भारताची फलंदाजी संकटात. धोनी-हार्दिक पांड्या जोडीवर भारताची मदार
विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी यांच्यात छोटेखानी भागीदारी. मात्र आदिल रशिदच्या गोलंदाजीवर विराट कोहली माघारी. भारताचा चौथा गडी माघारी. विराट कोहलीच्या ७२ चेंडूत ७१ धावा.
आदिल रशिदच्या गोलंदाजीवर कार्तिक त्रिफळाचीत, भारताचा तिसरा गडी माघारी. भारताने ओलांडला १०० धावांचा टप्पा
इंग्लंडच्या गोलंदाजांचा यशस्वीपणे समाचार घेत विराट कोहलीने अर्धशतक झळकावलं आहे
चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात शिखर धवन धावबाद. धवनच्या ४९ चेंडूत ४४ धावा.
शिखर धवन आणि विराट कोहली जोडीने इंग्लंडच्या गोलंदाजीवर हल्लाबोल करत अर्धशतकी भागीदारी रचली. दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी.
भारतीय सलामीवीरांकडून डावाची अडखळती सुरुवात. डेव्हिड विलीच्या गोलंदाजीवर मार्क वूडकडे झेल देत रोहित माघारी.
निर्णायक सामन्यासाठी भारतानेही आपल्या संघात दोन बदल केले आहेत. लोकेश राहुल आणि सिद्धार्थ कौलला विश्रांती देऊन दिनेश कार्तिक आणि शार्दुल ठाकूरला संघात जागा देण्यात आलेली आहे.