Ind vs Eng: पहिल्या दोन कसोटीत पराभव स्विकारावा लागल्यानंतर तिसऱ्या कसोटीतही भारतासमोर अडचणी काही केल्या कमी होण्याची चिन्ह दिसतं नाहीयेत. ट्रेंट ब्रिज येथे सुरु होणाऱ्या कसोटी सामन्याआधी भारताचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिकच्या बोटाला दुखापत झाली आहे. Cricbuzz या संकेतस्थळाशी बोलत असताना समालोचक हर्षा भोगले यांनी ही माहिती दिली आहे. दिनेश कार्तिकच्या जागी ऋषभ पंतला संघात जागा देण्यात आली आहे.

“दिनेशला झालेली दुखापत कितपत गंभीर आहे याची मला कल्पना नाही. मात्र ऋषभ पंत सध्या सराव करत आहे. परिस्थिती पाहता ऋषभ पंतला तिसऱ्या कसोटीसाठी संघात जागा मिळण्याची शक्यता आहे.” भोगले यांनी कार्तिकच्या दुखापतीविषयी माहिती दिली. अखेर विराट कोहलीने सामना सुरु होण्याआधी ऋषभ पंतला भारतीय संघाची टोपी देत त्याच्या समावेशावर शिक्कामोर्तब केलं आहे.

पहिल्या दोन कसोटींमध्ये दिनेश कार्तिकला फलंदाजी आणि यष्टीरक्षणात फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नव्हती. यातच दुसऱ्या कसोटीत इंग्लंडकडून डावाने पराभव स्विकारावा लागल्यानंतर दिनेश ऐवजी ऋषभ पंतला संघात जागा देण्याची मागणी होऊ लागली होती. त्यामुळे तिसऱ्या कसोटीसाठी भारत नेमका कोणत्या खेळाडूला संघात जागा देतो याकडे सर्व क्रीडाप्रेमींचं लक्ष असणार आहे.

Story img Loader