अखेरच्या षटकांत शार्दुल ठाकूरने केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर सलग दुसऱ्या सामन्यात भारताने सुपरओव्हरवर विजय मिळवला आहे. वेलिंग्टनच्या मैदानावर भारताने विजयासाठी दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ निर्धारीत षटकांमध्ये १६५ धावांपर्यंतच मजल मारु शकला. यानंतर सुपरओव्हरमध्ये भारतीय संघाने पुन्हा एकदा १४ धावांचं आव्हान सहज पार करत विजय मिळवला. या विजयासह भारताने ५ सामन्यांच्या मालिकेत ४-० अशी आघाडी घेतली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जसप्रीत बुमराहने सुपरओव्हरचं षटक टाकताना न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर चांगला अंकुश लावण्याचा प्रयत्न केला. टीम सेफर्टला माघारी धाडण्यात भारताला यशही आलं, तरीही मुनरो व इतर फलंदाजांनी फटकेबाजी करत भारतासमोर १४ धावांचं आव्हान ठेवलं. प्रत्युत्तरादाखल भारताकडून लोकेश राहुलने फटकेबाजी करत पहिल्या दोन चेंडूंमध्येच १० धावा केल्या. तिसऱ्या चेंडूवर फटकेबाजी करण्याच्या नादात राहुल माघारी परतला. मात्र विराट कोहलीने संजू सॅमसनच्या साथीने विजयी लक्ष्य पार करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

त्याआधी, मुंबईकर शार्दुल ठाकूरने अखेरच्या षटकांत केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने चौथा सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवलं. विजयासाठी १६६ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या फलंदाजांनी अखेरच्या षटकांत हाराकिरी केली. नवदीप सैनीने १९ वं तर शार्दुल ठाकूरने २० वं षटक भेदक मारा करत पुन्हा एकदा सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवलं. अर्धशतकवीर टीम सेफर्ट, रॉस टेलर यांना अखेरच्या षटकात माघारी धाडण्यामध्ये भारतीय गोलंदाजांना यश आलं. न्यूझीलंडकडून कॉलिन मुनरोने ६४ तर टीम सेफर्टने ५७ धावा केल्या.

भारतीय संघाने गोलंदाजीत आश्वासक सुरुवात करत मार्टीन गप्टीलला माघारी धाडलं. मात्र यानंतर कॉलिन मुनरो आणि टीम सेफर्ट यांनी आक्रमक फटकेबाजी करत सूत्र आपल्या हाती घेतली. भारतीय गोलंदाजांवर चौफेर हल्लाबोल चढवत दोन्ही फलंदाजांनी मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. यादरम्यान मुनरोने आपलं अर्धशतकही साजरं केलं. ही जोडी संघाला विजय मिळवून देणार असं वाटत असतानाच, मुनरो चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला.

यानंतर लगेचच चहलने टॉम ब्रुसला माघारी धाडत न्यूझीलंडला धक्का दिला. अखेरच्या षटकांतमध्ये भारतीय गोलंदाज वरचढ होत असल्याचं दिसताच, टीम सेफर्टने पुन्हा एकदा फटकेबाजी करत सामन्यावर न्यूझीलंडचं वर्चस्व प्रस्थापित केलं. नवदीप सैनीने १९ व्या षटकात भेदक मारा करत सामन्याचा निकाल अखेरच्या षटकापर्यंत नेला. शार्दुल ठाकूरनेही अखेरच्या षटकात पहिल्याच चेंडूवर रॉस टेलरला माघारी धाडलं. यानंतर त्याच षटकात अर्धशतकवीर टीम सेफर्ट चोरटी धाव घेताना धावबाद झाला. यानंतर मिचेलही शार्दुलच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. अखेरच्या चेंडूत विजयासाठी दोन धावा असताना सँटनर धावबाद झाल्यामुळे सामना बरोबरीत सुटला.

सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना, मनिष पांडेचं नाबाद अर्धशतक आणि सलामीवीर लोकेश राहुलच्या संयमी फलंदाजीच्या जोरावर भारताने चौथ्या टी-२० सामन्यात १६५ धावांपर्यंत मजल मारली आहे. मालिकेत विजयी आघाडी घेतल्यानंतर भारताने चौथ्या सामन्यात आपल्या महत्वाच्या खेळाडूंना विश्रांती दिली. मात्र हा प्रयोग पुरता फसला, न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करत भारतीय धावगतीला वेसण घातली. न्यूझीलंडकडून इश सोधीने आश्वासक मारा केला. भारताकडून मनिष पांडेने नाबाद ५० तर लोकेश राहुलने ३९ धावा केल्या.

रोहित शर्माच्या अनुपस्थितीत संघात संधी मिळालेल्या संजू सॅमसनने या सामन्यात पुन्हा एकदा निराशा केली. अवघ्या ८ धावा काढत कुगलेजनच्या गोलंदाजवर सॅमसन माघारी परतला. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि श्रेयस अय्यरही ठराविक अंतराने माघारी परतले. सलामीवीर लोकेश राहुलने एक बाजू लावून धरत धावा जमवण्याचा प्रयत्न केला. शिवम दुबेच्या साथीने त्याने महत्वपूर्ण भागीदारीही केली, मात्र इश सोधीने त्यालाही माघारी धाडलं. यानंतर मधल्या फळीत मनिष पांडे आणि शार्दुल ठाकूर यांनी फटकेबाजी करत संघाला शतकी धावसंख्येचा टप्पा ओलांडून दिला.

न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी सुरुवातीच्या षटकापासून भारतीय फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची संधीच दिली नाही. विशेषकरुन इश सोधीने भारतीय फलंदाजांना आपल्या जाळ्यात अडकवलं. शार्दुल ठाकूर अखेरच्या षटकांत माघारी परतल्यानंतर मनिष पांडेने तळातल्या फळीतल्या फलंदाजांना सोबत घेत भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारुन दिली. न्यूझीलंडकडून फिरकीपटू इश सोधीने ३, हमिश बेनेटने २ तर टीम साऊदी-कुगलेजन आणि सँटनर यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

Live Blog

Highlights

  • 13:53 (IST)

    शार्दुल ठाकूर - मनिष पांडे जोडीची फटकेबाजी

    ?????? ?????? ??????? ???? ??????????? ?????

  • 13:24 (IST)

    लोकेश राहुल माघारी, भारताला चौथा धक्का

    ???? ???? ??? ????? ????? ????? ???????? ??? ?????? ??? ?????????? ??????? ????

    ????? ?? ???????? ?????????? ????? ????????? ?????????? ??????, ??????? ?????? ?? ????

  • 12:58 (IST)

    भारताला मोठा धक्का, कर्णधार विराट कोहली माघारी

    ???? ????????? ?????????? ???? ?????? ??????? ???? ?????, ????? ??????? ????? ??????? ????? ???

  • 12:42 (IST)

    भारताला पहिला धक्का, संजू सॅमसन माघारी

    ????????? ??????????? ???? ?????????? ????????? ?????? ???? ??????

    ??????????? ?????????? ??? ???? ??????????? ????????? ??????? ????? ??????? ???, ??????? ????? ?????

    ?????? ? ???? ????? ????? ?????? ?????

16:42 (IST)31 Jan 2020
सुपरओव्हर : पाचव्या चेंडूवर विराटने खेचला चौकार, भारत विजयी

सुपरओव्हर : पाचव्या चेंडूवर विराटने चौकार खेचला भारताला विजय मिळवून दिला. 

16:40 (IST)31 Jan 2020
सुपरओव्हर : संजु सॅमसन फलंदाजीसाठी मैदानात. चौथ्या चेंडूवर विराटने काढल्या दोन धावा.

सुपरओव्हर : संजु सॅमसन फलंदाजीसाठी मैदाना. चौथ्या चेंडूवर विराटने काढल्या दोन धावा.  भारताला २ चेंडूंमध्ये हव्या २ धावा.

16:38 (IST)31 Jan 2020
सुपरओव्हर : तिसऱ्या चेंडूवर के.एल. राहुल बाद

सुपरओव्हर : तिसऱ्या चेंडूवर के.एल. राहुल झेलबाद झाला. भारताला ३ चेंडुंमध्ये हव्या ४ धावा. 

16:37 (IST)31 Jan 2020
सुपरओव्हर : दुसऱ्या चेंडूवर के.एल. राहुलने मारला चौकार

सुपरओव्हर : दुसऱ्या चेंडूवर के.एल. राहुलने चौकार मारला.  भारताच्या दोना चेंडूत १० धावा. जिंकण्यासाठी हव्या ४ धावा.

16:36 (IST)31 Jan 2020
सुपरओव्हर : पहिल्या चेंडूवर के.एल. राहुलने खेचला षटकार

सुपरओव्हर : पहिल्या चेंडूवर के.एल. राहुलने खेचला षटकार. भारताच्या एका चेंडूत ६ धावा. जिंकण्यासाठी हव्या ८ धावा.

16:34 (IST)31 Jan 2020
सुपरओव्हर : भारताकडून विराट कोहली आणि के.एल. राहुल फलंदाजीसाठी उतरले

सुपरओव्हर : भारताकडून विराट कोहली आणि के.एल. राहुल फलंदाजीसाठी उतरले. न्यूझीलंडने सुपरओव्हरसाठी टीम साउदीच्या हाती चेंडू सोपवला. 

16:33 (IST)31 Jan 2020
सुपरओव्हर : सहाव्या चेंडूवर एक धाव

सुपरओव्हरमध्ये सहाव्या चेंडूवर एक धाव. न्यूझीलंडचा स्कोअर एक बाद १३ धावा.

भारताला जिंकण्यासाठी एका षटकात १४ धावांची गरज.

16:32 (IST)31 Jan 2020
सुपरओव्हर : पाचव्या चेंडूवर चौकार

सुपरओव्हरच्या पाचव्या चेंडूवर कॉलिन मुनरोने चौकार खेचला. न्यूझीलंडचा स्कोअर एक बाद १२ धावा.

16:28 (IST)31 Jan 2020
सुपरओव्हर : चौथ्या चेंडूवर बुमराहने काढली विकेट

चौथ्या चेंडूवर बुमराहने सेफर्टला झेलबाद केले. न्यूझीलंडचा स्कोअर एक बाद ८ धावा.

16:26 (IST)31 Jan 2020
सुपरओव्हर : तिसऱ्या चेंडूवर राहुल झेल पकडण्यात अपयशी, आणखी दोन धावा

सुपरओव्हर : तिसऱ्या चेंडूवर राहुल झेल पकडण्यात अपयशी, आणखी दोन धावा न्यूझीलंडला मिळाल्या. न्यूझीलंडचा स्कोअर ८ धावा. 

16:25 (IST)31 Jan 2020
सुपरओव्हर : दुसऱ्या चेंडूवर सेफर्टचा चौकार

दुसऱ्या चेंडूवर सेफर्टने बुमराहला चौकार लगावला. न्यूझीलंडचा स्कोअर ६ धावा. 

16:24 (IST)31 Jan 2020
सुपरओव्हरमध्ये न्यूझीलंडची प्रथम फलंदाजी

सुपरओव्हरमध्ये न्यूझीलंड प्रथम फलंदाजीस आली असून, पहिल्यांच चेंडूवर श्रेयस अय्यरने झेल सोडला. पहिल्या चेंडूत दोन धावा.

16:17 (IST)31 Jan 2020
शार्दुल ठाकूरच्या अखेरच्या षटकात ४ गडी माघारी, सामना सुपरओव्हरमध्ये

सलग दुसरा सामना अनिर्णित, शार्दुल ठाकूरचा भेदक मारा

16:07 (IST)31 Jan 2020
अखेरच्या षटकात न्यूझीलंडला चौथा धक्का, रॉस टेलर माघारी

शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर श्रेयस अय्यरने घेतला झेल

15:57 (IST)31 Jan 2020
टीम सेफर्टचं अर्धशतक

न्यूझीलंड विजयाच्या जवळ

15:27 (IST)31 Jan 2020
न्यूझीलंडला तिसरा धक्का, टॉम ब्रुस माघारी

युजवेंद्र चहलने उडवला ब्रुसचा त्रिफळा, भोपळाही न फोडता ब्रुस माघारी

15:25 (IST)31 Jan 2020
अखेर न्यूझीलंडची जमलेली जोडी फुटली, मुनरो माघारी

चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात मुनरो धावबाद, भारताला सामन्यात दुसरं यश

४७ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने मुनरोच्या ६४ धावा

15:13 (IST)31 Jan 2020
कॉलिन मुनरोचं अर्धशतक

टीम सेफर्टच्या साथीने संघाचा डाव सावरत मुनरोचं अर्धशतक

भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत मैदानाच्या चौफेर फटकेबाजी

14:55 (IST)31 Jan 2020
न्यूझीलंडला पहिला धक्का, मार्टीन गप्टील माघारी

जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात यष्टीरक्षक राहुलकडे झेल देत गप्टील बाद, भारताला पहिलं यश

14:15 (IST)31 Jan 2020
भारताची १६५ धावांपर्यंत मजल

न्यूझीलंडला विजयासाठी १६६ धावांचं आव्हान, सुरुवातीच्या पडझडीनंतर भारताचं दमदार पुनरागमन

14:14 (IST)31 Jan 2020
मनिष पांडेचं नाबाद अर्धशतक

तळातल्या फळीतील फलंदाजांना सोबत घेत पांडेने भारताचा डाव सावरला

13:59 (IST)31 Jan 2020
युजवेंद्र चहल माघारी, भारताला आठवा धक्का

कर्णधार टीम साऊदीने घेतला बळी

13:54 (IST)31 Jan 2020
भारताला सातवा धक्का, शार्दुल ठाकूर बाद

बेनेटच्या गोलंदाजीवर कर्णधार साऊदीने घेतला झेल, ठाकूरच्या २० धावा

13:53 (IST)31 Jan 2020

भारतीय संघाने ओलांडला शतकी धावसंख्येचा टप्पा

13:32 (IST)31 Jan 2020
वॉशिंग्टन सुंदर त्रिफळाचीत, भारताला सहावा धक्का

मिचेल सँटनरने घेतला बळी, भारतीय फलंदाज ढेपाळले

न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा भेदक मारा

13:28 (IST)31 Jan 2020
शिवम दुबे माघारी, भारताला पाचवा धक्का

इश सोधीच्या गोलंदाजीवर भारताचे फलंदाज ढेपाळले

शिवम दुबे १२ धावा काढून माघारी परतला, भारताचा निम्मा संघ माघारी

13:24 (IST)31 Jan 2020
लोकेश राहुल माघारी, भारताला चौथा धक्का

शिवम दुबे आणि लोकेश राहुल यांनी फटकेबाजी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला

मात्र इश सोधीच्या गोलंदाजीवर राहुल सँटनरच्या गोलंदाजीवर माघारी, राहुलने केल्या ३९ धावा

13:08 (IST)31 Jan 2020
श्रेयस अय्यर माघारी, भारताला तिसरा धक्का

भारतीय फलंदाजांची हाराकिरी सुरुच, श्रेयस अय्यर इश सोधीच्या गोलंदाजीवर यष्टीचीत

भारतीय फलंदाजांनी ओलांडला ५० धावांचा टप्पा

12:58 (IST)31 Jan 2020

हमीश बेनेटच्या गोलंदाजीवर खेळत असताना विराटचा फटका चुकला, मिचेल सँटनरने घेतला विराटचा सुरेख झेल

12:42 (IST)31 Jan 2020
भारताला पहिला धक्का, संजू सॅमसन माघारी

रोहितच्या अनुपस्थितीत संधी मिळालेल्या सॅमसनकडून पुन्हा एकदा निराशा

कुगलेजनच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात सँटनरने घेतला सॅमसनचा झेल, भारताला पहिला धक्का

अवघ्या ८ धावा काढून सॅमसन माघारी परतला

12:15 (IST)31 Jan 2020
भारतीय संघात तीन बदल, संजू सॅमसनला संधी
12:14 (IST)31 Jan 2020
टीम साऊदीने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय
12:13 (IST)31 Jan 2020
चौथ्या सामन्याआधी न्यूझीलंडला धक्का, कर्णधार विल्यमसन संघाबाहेर