न्यूझीलंड दौऱयावर असलेल्या भारतीय संघात कोणतीही कमतरता नाही. सर्वजण उत्कृष्ट आहेत तरीसुद्धा आमची गोलंदाजी-फलंदाजी चांगली का होत नाही आहे? हे कळण्याचा काही मार्गच नाही. असे मत अष्टपैलू रविंद्र जडेजाने व्यक्त केले आहे.
पराभवाचे प्रमाण सध्या वाढत चालले आहे. हे आता रोखणे गरजेचे आहे. काही छोट्या-मोठ्या गोष्टी आहेत की ज्या आम्ही टाळणे गरजेचे आहे. ते नक्कीच आम्ही करू चांगली गोलंदाजी आणि फलंदाजी होण्यासाठी काही मोठे बदल करावे लागतील असे मला वाटत नाही. असे म्हणत जडेजाने भारतीय संघाची पाठराखण केली. सध्याचा भारतीय संघ योग्य असून पाचव्या सामन्यात सकारात्मक निकाल येईल असेही जडेजाने स्पष्ट केले.
मालिका गमावली असली तरी पाचवा सामना प्रतिष्ठा आणि कसोटी सामन्यांमध्ये प्रबळ आत्मविश्वासाने खेळता यावे यासाठी महत्वाचे आहे. त्यामुळे हा सामना आम्हाला जिंकायचा असल्याचे रविंद्र जडेजाने म्हटले.
न्यूझीलंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारताने तीन सामने गमावले आहेत तर, एक सामना बरोबरीत सुटला आहे. त्यामुळे पाचव्या सामना जर, टीम इंडिया हरली तर, भारतावर ४-० अशी नामुष्की ओढावेल. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा