कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांच्यातील शतकी भागीदारीच्या जोरावर भारताने पहिल्या वन-डे मालिकेत दक्षिण आफ्रिकेवर ६ गडी राखून विजय मिळवला. आफ्रिकेने दिलेल्या २७० धावांचा पाठलाग करताना भारतीय कर्णधार विराट कोहलीने आक्रमक शतकी खेळी केली. विराटने या सामन्यात आपला फलंदाजीचा फॉर्म कायम ठेवत ११२ धावा काढल्या. अखेरच्या षटकात फटकेबाजी करण्याच्या नादात विराट झेलबाद झाला. त्याला दुसऱ्या बाजूने अजिंक्य रहाणेने संयमी खेळी करुन चांगली साथ दिली. या दोघांमध्येही तिसऱ्या विकेटसाठी १८९ धावांची शतकी भागीदारी झाली. सामना जिंकण्यासाठी अवघ्या काही धावांची आवश्यकता असताना अजिंक्य रहाणेचा अडसर दूर करण्यात आफ्रिकेच्या गोलंदाजांना यश आलं, मात्र तोपर्यंत भारताने सामन्यात आपली बाजू भक्कम केली होती. त्याआधी भारतीय सलामीवीरांनी डावाची सुरुवात अतिशय आक्रमक पद्धतीने केली होती. मात्र रोहित शर्मा मोठा फटका खेळण्याच्या नादात तर शिखर धवन चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नान धावबाद होऊन माघारी परतला. यानंतर भारतीय संघ कसोटी क्रिकेटप्रमाणे पुन्हा अडचणीत सापडणार असं वाटत असतानाच विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेच्या शतकी भागीदारीने भारताचा विजय सोपा केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा