पहिल्या ३ वन-डे सामन्यात आफ्रिकेवर मात केल्यानंतर भारताला पहिल्यांदा पराभवाचा सामना करावा लागला. चौथ्या वन-डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेने डकवर्थ लुईस नियमांच्या आधारे भारतावर ५ गडी राखून मात केली. पाऊस आणि विजेच्या कडकडाटामुळे सामन्यात काही क्षणांसाठी व्यत्यय आला होता. अखेर आफ्रिकेसमोर २८ षटकांत २०२ धावांचं सुधारित आव्हान ठेवण्यात आलं. जे आफ्रिकेच्या फलंदाजांनी अखेरच्या षटकात फटकेबाजी करत पूर्ण केलं.
अवश्य वाचा – शंभराव्या सामन्यात धडाकेबाज शतकी खेळी, भारताच्या ‘गब्बर’चा अनोखा विक्रम
भारताकडून शिखर धवनने आपला १०० वा सामना खेळताना शतकाची नोंद केली. त्याला विराट कोहलीनेही दुसऱ्या बाजूने चांगली साथ दिली. या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला असता तरीही तब्बल १२ विक्रमांची नोंद जोहान्सबर्गच्या मैदानात करण्यात आली.
० – विराट कोहलीचा अपवाद वगळता एकाही कर्णधाराला दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर सर्वाधिक धावा करता आलेल्या नाहीयेत. विराटने कालच्या सामन्यात वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराच्या नावावर असलेला ६२७ धावांचा विक्रम मोडला.
१- आपल्या शंभराव्या सामन्यात शतक झळकावणारा शिखर धवन पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.
४ – वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद १३ शतकं करणाऱ्यांच्या यादीत शिखर धवन चौथ्या स्थानावर. त्याने ९९ डावांमध्ये हा विक्रम केला आहे. दक्षिण आफ्रिकेचा हाशिम आमला या यादीत पुढे असून त्याने ८३ डावांमध्ये ही किमया साधली आहे.
५ – भारताकडून वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्यांच्या यादीत कर्णधार विराट कोहली पाचव्या स्थानावर. १९८ डावांमध्ये विराटच्या नावावर सध्या ९४२३ धावा जमा आहेत.
६ – ‘पिंक वन-डे’ जिंकण्याची दक्षिण आफ्रिकेची ही सहावी वेळ ठरली. आतापर्यंत झालेल्या सर्व पिंक वन-डे सामन्यांमध्ये आफ्रिका अजिंक्य राहिलेली आहे.
९ – १०० व्या वन-डे सामन्यात शतक झळकावणारा शिखर धवन आंतरराष्ट्रीय क्रिकेटलमधला नववा फलंदाज ठरला. या विक्रमासह शिखर; जी. ग्रिनीज, ख्रिस क्रेन्स, मोहम्मद युसूफ, ख्रिस गेल, कुमार संगकारा, मार्क टेस्कॉथिक, रामनरेश सारवान आणि डेव्हिड वॉर्नर यांसारख्या फलंदाजांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे.
१० – २०१३ सालपासून सलामीला फलंदाजीसाठी यायला लागल्यानंतर कोणत्याही मालिकेतली रोहित शर्माची ही सर्वात निच्चांकी सरासरी ठरली आहे.
२४ – आतापर्यंत भारतीय फिरकीपटूंनी मालिकेत २४ फलंदाजांना माघारी धाडलं आहे. यासह भारतीय खेळाडूंनी २०१३ साली झिम्बाब्वे दौऱ्यातील आपल्याच विक्रमाशी बरोबरी साधली आहे.
६१.३३ – दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विराट कोहलीची ६१.३३ ही सरासरी आतापर्यंत सर्वोत्तम मानली जात आहे.
४६० – कालच्या सामन्यात ५ चेंडुत २३ धावा ठोकणाऱ्या फेलुक्वायोचा स्ट्राईक रेट ४६० इतका होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये किमान ५ चेंडु खेळणाऱ्या फलंदाजांच्या यादीत हा सर्वोत्तम स्ट्राईक रेट मानला जातो.
६४५ – परदेश दौऱ्यावर कर्णधार या नात्याने सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम याआधी राहुल द्रविडच्या नावावर होता. चौथ्या वन-डे सामन्यात आक्रमक अर्धशतकी खेळी करुन विराटने हा विक्रमही आता आपल्या नावे केला आहे.
४३०९ – शिखर धवनने १०० वन-डे सामन्यात केलेल्या ४३०९ धावा ही आतापर्यंती सर्वोत्तम दुसरी कामगिरी मानली जातेय. दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमलाने १०० वन-डे सामन्यांमध्ये ४८०८ धावा काढल्या होत्या.